प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार –:तळोदा तालुक्यातील बोरद येथे ओट्यावर एकमेकांशी मस्करी करुन हसत असल्याचा राग आल्याने आई , मुलगी व मुलाला मारहाण केल्या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , तळोदा तालुक्यातील बोरद येथील भुराबाई शांतीलाल माळी व त्यांची मुलगी व मुलगा घरा समोरील ओट्यावर एकमेकांशी मस्करी करुन हसून गप्पा करीत होते . याचा राग आल्याने सताबाई संजय नाईक यांनी भुराबाई शांतीलाल माळी यांना कपडे धुण्याच्या थापीने डोक्यावर मारुन दुखापत केली .
भूराबाई माळी यांची मुलगी व मुलगा यांनाही बिंद्राबाई गजानन नाईक , संजय गजानन नाईक यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली .
या बाबत भुराबाई माळी यांच्या फिर्यादी वरुन तळोदा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोना . विजय वसावे करीत आहेत .