नवापूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासातच उघड : 37 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपी नवापूर पोलीसांच्या ताब्यात….

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: नवापूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासातच उघड , 37 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपी नवापूर पोलीसांच्या ताब्यात.      या बाबत अधिक माहिती अशी कि दि. 18 सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता, नवापूर शहरातील अभय मोहीते हे जेवण करुन त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा बंद करून झोपुन गेले होते . दि.19 सप्टेंबर रोजी सकाळी ते नेहमी प्रमाणे साडेसहा वाजेचे सुमारास झोपेतून उठले , तेव्हा त्यांना त्यांच्या घरातील पंलगावर व कपाटावर ठेवलेले 37,000 रुपये किमंतीचे दोन मोबाईल त्यांचे राहते घराचे मागील बाजूस असलेला दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले .    तसेच त्यांचे दोन मोबाईल घरात नसल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांची चोरी झाल्याची खात्री झाली त्या नंतर अभय राजु मोहीते (वय 20 )रा . देवळफळी , नवापुर जि.नंदुरबार यांचे फिर्यादी वरून नवापूर पोलीस ठाणे येथे 482/2022 भा.द.वि. कलम 457,380 प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .   सदर चा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत आदेशीत केले .    नवापूर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत माहिती मिळविली की , सदर ची घरफोडी ही देवळफळी परिसरात राहणारा मोहीन आलवाला याने केलेली आहे त्यामुळे त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना सदर माहिती कळवून संशयीत आरोपी मोहीन आलवाला यास ताब्यात घेवून माहितीची खात्री करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेशीत केले . नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांनी देवळफळी परिसरात साध्या वेशात जावून सापळा रचून मोहीन आलवाला यास शिताफीने ताब्यात घेतले . त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने मोहीन सलीम आलवाला (वय 22) रा . देवळफळी , नवापुर जि . नंदुरबार असे सांगितले . त्यास अभय मोहीते यांचे घरातील चोरी झालेल्या दोन मोबाईल बाबत विचारपूस केली असता सुरवातीला तो उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला नंतर त्यास नवापूर पोलीस ठाणे येथे आणून पुन्हा विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून गुन्ह्यातील 37,000 रुपये किमतीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत . नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी मालमत्तेविरुध्दचा गंभीर गुन्हा अवघ्या 24 तासात उघड करुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला म्हणून पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाचे अभिनंदन केले .   सदर ची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक निलेश वाघ , पोलीस हवालदार दादाभाई वाघ , पोलीस नाईक नितीन नाईक , विनोद पराडके , पोलीस कॉन्सटेबल संदिप सोनवणे यांचे पथकाने केली आहे .

0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *