सण उत्सवातही होणार का लाईन ड्रीप ?

Khozmaster
1 Min Read

दिपक मापारी, रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातही तासभराच्या अंतराने लाईन ड्रिप होत असल्याचे प्रकार घडत आहे. शहरी व ग्रामीण भागात हा प्रकार सर्वाधिक असून लाईन ड्रीप मुळे भारनियमच होत असल्याचा भास होत आहे. अद्याप भारनियमन सुरू झालेले नाही तरीही अवेळी बंद होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गा उत्सव साजरा होणारा असून मोठ मोठाले देखावे विद्युत रोषणाई दुर्गा उत्सवाच्या वतीने करण्यात येणार आहे. सायंकाळी या विद्युत रोषणाई विशेष महत्त्व असणार आहे. अशा स्थितीत विजेचा लपंडाव झाल्याची शहरवासी व ग्रामीण भागातील भक्ताचा मोठा हेडमोड होणार आहे. शहरात ३०ते ४० मिनिटासाठी वीज पुरवठा बंद होतो. वीज पुरवठा बंद होताच विजेवरील उपकरणे बंद होत असल्याने सर्व सामान्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. हाच त्रास दुर्गा उत्सवा दरम्यान झाल्यास मोठ्या प्रमाणात मंडळाची धावपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वतीने या लाईन ड्रिप पहिलेच उपायोजना करून ठेवणे आवश्यक झाले आहे..

 

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *