रिसोड हिंगोली मार्गावर अपघाताची मालिका सुरूच..!!

Khozmaster
1 Min Read

दिपक मापारी, रिसोड ते सेनगाव हिंगोली या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून दररोज अपघात होत आहेत. दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजताचे दरम्यान नांदेड येथून सुलतानपूरकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाला. कारमधील चौघेही किरकोळ जखमी झाले आहेत. रस्त्याचे काम अर्धवट असल्याचा फटका सर्व सामान्य प्रवाशांना बसत आहे. मालेगाव ते रिसोड व रिसोड ते हिंगोली या रस्त्याचे काम ठिकठिकाणी रखडले आहेत. बिबखेडा ते रिसोड पर्यंत चारचाकी वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्याचप्रमाणे रिसोड पासून ग्रामीण रुग्णालयाच्या पुढे एक किलोमीटर पर्यंत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. इथून पुढे मात्र सिमेंट रोडचे काम हिंगोली पर्यंत झाले आहे. सिमेंट रोड व जुना डांबरी रस्ता या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे अपघात होत आहेत. संबंधित विभागाने दखल घेण्याची गरज आहे..

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *