ग्रामीण भागातील विविध मुख्य रस्त्यावरील खड्डे व पुलाची दुरुस्ती व उंची वाढविणे गरजेचे – गोपाल भिसडे

Khozmaster
2 Min Read

दिपक मापारी, रिसोड ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे, मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे, तसेच मुख्य रस्त्यावर असलेले जुनाट पूल खचले आहेत याकडे जातीने लक्ष द्यावे तसेच ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यावरील पुलाची कमी असल्याने नदीला पूर आलेल्या पुलावर पाणी मोठ्या प्रमाणात राहते, त्यामुळे लोकांना ये -जा करता येत नाही, प्रवास जागच्या जागीच स्तब्ध झालेला असतो, शाळा महाविद्यालय पाच पाच आठ दिवस बंद असतात, अतिरिक्त पेशंट असला तर जागच्या जागीच मरून जाईल परंतु पुढच्या काठी जाणार नाही अशी भीषण समस्या निर्माण झालेली आहे,पावसाच्या पाण्यामुळे नदीवरील पुलावर पूर येत आहेत, कारण जुने सिमेंट पाईपची पूल असल्याने नदीमध्ये वाहून येणारा कचरा, झाडे झुडू काट्या पुलाच्या पाईप मध्ये अडकून ते बंद होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या पुराचे पाणी सारखे पुलावरून जात आहे व त्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, तसेच बाहेर गावी गेलेल्या लोकांना गावांमध्ये परत येता येत नाही तर गावातील लोकांना पूर आल्यानंतर गावा बाहेर जाता येत नाही ग्रामीण भागातील मुख्य रस्त्याची रुंदी एवढी कमी आहे की समोरून आलेल्या वाहनांना साईट देता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये लोक अडकलेले आहेत व शासनाकडे आशेने बघत आहेत तरी मा. अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदना द्वारे विनंती केली आहे की ग्रामीण भागातील विविध मुख्य रस्त्यावरील खड्डे व पुलाची दुरुस्ती व उंची वाढवणे तसेच रुंदी वाढवणे व यावर जातीने लक्ष घालून आम्हा गावकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा. असे निवेदनात नमूद करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी दिले आहे..

 

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *