फर्दापूर येथे अनोळखी महिलाचा अकस्मात मृत्यू

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत‌ओळख पटविण्याचे सपोनि देवीदास वाघमोडे यांचे आवाहन सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथील एक अनोळखी महिलेचा अकस्मात मृत्यू फर्दापूर पोलीस ठाणे अकस्मात मृत्यु नोंद क्रमांक 09/2022 मधील अनोळखी मयत महिला ही दिनांक 04/09/2022 पासुन जुन्या आजारावर औषधोपचार कामी जिल्हा रुग्णालय, जळगांव येथे दाखल झाली होती तिचेवर औषधोपचार सुरु असतांना ती 09/09/2022 रोजी मयत झाली आहे. सदर अनोळखी मयत महिला हिचे वारसांचा तसेच नातेवाईकांचा शोध घेऊन देखील त्यांचा शोध लागलेला नसुन सदर अनोळखी मयत महिला हिचे प्रेत अधिक काळ ठेवल्यास सदरचे प्रेत कुजून त्यातून दुर्गधी येऊन ते आरोग्यास हानिकारक असल्याने सदर मयत अनोळखी मयत महिलेच्या प्रेतावर जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव यांचेकडून अंतिम संस्कार करण्यात आले आहे. तरी सदर मयत अनोळखी महिला हिचेबाबत कोणास काही माहिती असल्यास तात्काळ खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

1) सपोनि देवीदास वाघमोडे, फर्दापुर पोलीस ठाणे, मो.क्र.8888810042

2) एन.जी.लोखंडे, पोलीस नाईक फर्दापुर पोलीस ठाणे, मो.क्रं.9370711998

3) वाय.पी.कोळी, पोलीस अंमलदार मो.क्रं. 9653477509

0 9 4 8 9 4
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *