न.प. प्रशासनाचे कचऱ्याच्या समस्येकडे दुर्लक्ष व कर वाढविण्यावर भर
माजी नगराध्यक्ष व्दारकाप्रसाद दुबे यांनी नागरिकांच्या समस्या स्थानिक प्रशासनाकडे केल्या निवेदनाव्दारे सादर
मुर्तिजापुर (भुषण महाजन) – स्वच्छ अभियाना अंतर्गत मुर्तिजापुर येथील नगर परिषदेला केंद्र सरकार कडून आयोजित झालेल्या स्वच्छ अभियान स्पर्धेमध्ये पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सध्या परिस्थिती मध्ये मुर्तिजापुर शहराची कचऱ्याबाबत गंभर समस्या निर्माण झाली आहे. याला अपवाद आहे तो कचरा गाडीचा कंत्राट संपण्याचे.
स्वच्छ अभियानाअंतर्गत व शहरे हागणदारीमुक्त करणे तसेच घनकचऱ्याचे व्यवस्थापन करुन शहर स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने मुर्तिजापुर शहरा मध्ये कचरा गाडयांचे उदघाटन मोठया थाटा-माटा करण्यात आले. परंतू हे फक्त चार दीन की चांदनी सारखे होवून शहराची परिस्थिती जैसे थे झाली आहे. कचरा गाडी सुरु होत्या तेव्हा सुध्दा फक्त निदर्शनास येणाऱ्या जागांचीच स्वच्छता होत होती.
याउलट नगर पालिका प्रशासनाने शहराचे सौंदर्यकरण व स्वच्छतेवर दुर्लक्ष करुन संपूर्ण शहरातील घरांचे व दुकानांचे करामध्ये अतोनात वाढ केली शिवाय नाहरकप्रमाणपत्राची रक्कम सुध्दा वाढविली आहे. या सर्व समस्यांचे गाऱ्हाण्या संदर्भात मा. व्दारकाप्रसाद दुबे यांनी निवेदन सादर केले आहे.
कचऱ्याच्या गंभीर प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होवून महागाईच्या परिस्थितीमध्ये खिशाला झळ पोहचून आर्थिक गणित बिघतड आहे.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या पंधरवाडयामध्ये जिल्हाप्रशासनाकडून विविध समस्येचा व तक्रार अर्जाचा निपटारा करण्याचे आवाहन केलेले आहे. आता तरी मा. व्दारकाप्रसाद दुबे यांच्या अर्जाची दखल घेवून या गंभीर समस्येचे स्थानिक प्रशासन निरसन करते की, काय ? नुसता कागदोपत्री निपटारा करते. याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष आहे.

Users Today : 22