मुंडगाव येथे घाणीचे साम्राज्य वार्ड क्र.१ च्या नागरिकांचे ग्रामपंचायतला निवेदन

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील वार्ड. क्रमांक १ चे धर्माळ परिसर रहिवासी यांनी आज सांडपाणी तसेच नालीबांधकाम संबंधीचे निवेदन ग्रामसेवक जाधवने यांना दिले.याबद्दल सविस्तर वृत्त असे कि, आठवडी बाजार परिसर तसेच धर्माळ परिसर हा ग्रामपंचायत च्या नियोजनहिन कार्यप्रणालीमुळे नेहमीच घाणीचे साम्राज्य असलेला परिसर राहिलेला आहे. येथे गुरा ढोरांच्या पाणी-पिण्याच्या सोयीसाठी असलेला धर्माळ असून त्यामधून होणाऱ्या सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी कुठलेही नाली-बांधकाम करण्यात आलेले नाही. तसेच येथील आठ ते दहा घरांचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी देखील कुठलेच नाली बांधकाम स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुद्धा करण्यात आले नाही. विकासाच्या दृष्टीने हा वार्ड आणि धर्माळ परिसर नेहमीच उपेक्षित राहिला आहे.पावसाचे पडणारे पाणी सुद्धा वाहून जाण्याची कुठलीच व्यवस्था येथे नसून सर्व पाणी डबक्याच्या स्वरूपात साचते आणि जागीच मुरते त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजारांची समस्या वारंवार निर्माण होत राहते. पावसाळ्यात ह्या परिसराला अतिशय गलिच्छ वस्तीचे स्वरूप येत असते.या संबंधी वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला आवाहन विनंती करून देखील कुठलीच कार्यवाही त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही.त्या अनुषंगाने आज ह्या परिसरातील नागरिकांनी ग्रामसेवकांना निवेदन दिले.यावेळी सरपंच आणि उपसरपंच यांना संपर्क करूनही ते उपलब्ध होऊ शकले नाही. ह्या निवेदनावर परिसरातील १५ लोकांच्या सह्या असून निवेदन देते वेळी मनिष सरकटे, रमेश आखरे, जिवन आखरे, संतोष ढोले, अमोल ढोले, अभिषेक दोरकर, प्रदीप पुराळे, यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष भगवान गावंडे हे उपस्थित होते. यावेळी आठ दिवसात कुठलीच कार्यवाही न झाल्यास ह्या परिसरातील कचरा ग्रामपंचायत मध्ये आणून टाकण्याचा इशारा देण्यात आला.

 

पाहणी करून लवरात लवकर काही तरी व्यवस्था केली जाणार आहे.

ग्रामसेवक जाधव

 

धर्माळ परिसर रहिवासी स्वच्छतेच्या दृष्टीने अतिशय घातक अशा नरक यातना सहन करत आहे. सांडपाणी तसेच पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था ग्रामपंचायत ने केलेली नसून पाणी जागीच मुरत असल्याने आरोग्याचा भयंकर प्रश्न सतत उपस्थित होत राहतो.

मनिष सरकटे

स्थानिक रहिवासी

 

0 9 4 6 2 2
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *