गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दणका …

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दणका…      या बाबत सविस्तर माहिती अशी कि, दि.26 ते 05 सप्टेंबर रोजी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे .    नवरौत्सवाच्या अनुषंगाने मंदिर व यात्रौत्सव दरम्यान गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढण्याचे प्रकार काही टवाळखोर युवकांकडून होत असतात त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुध्द् पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार यांचे एक दामिनी पथक तयार करुन टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुध्द् कारवाई करणे बाबत चे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते .  त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणे -14 , अक्कलकुवा पोलीस ठाणे – 02 व दामिनी पथक -05 असे एकुण 21 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे .    तसेच सदर युवकांनी यापुढे अशा प्रकारचे कृत्य केले तर त्यांच्या पालकांना संबंधीत पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या पाल्याच्या कृत्या बद्दल समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात येईल . तसेच पुन्हा त्या युवकांनी तिसऱ्या वेळेस देखील अशा प्रकारचे कृत्य केले तर त्याचे विरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल . नवरात्रौत्सवा दरम्यान जिल्हयातील वेगवेगळया सार्वजनिक ठिकाणी गरव्याचे आयोजन केले जात असून त्या ठिकाणी असणान्या टवाळखोर युवकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली असून अशा टवाळखोर युवकांविरुध्द् कारवाई करणे बाबत चे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत .   सदर ची मोहिम नवरात्रौत्सवा दरम्यान अजून प्रभावी पणे राबविण्यात येणार आहे . त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्ये करण्यापासून त्यांना परावृत्त करावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी सर्व पालकांना केले आहे .

 

0 9 4 5 6 0
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *