प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: शहरातील खोडाई माता यात्रौत्सवाच्या अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल.दि.26 ते 05 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे . नवरात्रौत्सव अनुषंगाने नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर येथे यात्रौत्सव भरवण्यात येत असतो . यात्रौत्सवाच्या कालावधीत मंदिराचे परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात . यात्रौत्सवाच्या कालावधीत मंदिरात व यात्रेत वयोवृध्द् व्यक्ती , स्त्रि , पुरुष , लहान मुले मुली इत्यादी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात . तसेच बाहेर गावाहुन दुचाकी , चारचाकी वाहनांवर आलेल्या भाविकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो . त्याच प्रकारे मंदिराचे परिसरात विविध खेळण्यांचे दुकान , खाण्याचे हॉटेल , स्टॉल , मनोरंजनाचे पाळणे इतर दुकाने असतात . यात्रोत्सव दरम्यान आलेले भाविक त्यांची दुचाकी , चारचाकी मंदिराचे परिसरात लावल्यामुळे भाविकांची गैरसोय होवून त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो ही बाब लक्षात घेवून,पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर यात्रौत्सवात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे या साठी नंदुरबार जिल्हा पोलीस दला तर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे . तसेच या बाबत चे स्वतंत्र आदेश पो.अधीक्षक पाटील यांनी निर्गमित केलेले आहेत . नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर परिसरात दि. 26 ते 05 दरम्यान दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर परिसरात त्यांचे दुचाकी व चारचाकी तसेच इतर वाहने,जगतापवाडी चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समिती मेन गेट, डी . आर . हायस्कुल ते संतोषी माता मंदिर या मुख्य रस्त्यांवर दुचाकी , तीनचाकी चारचाकी वाहने पार्किंग करण्यास बंदी करण्यात आलेली आहे . खोडाई माता यात्रौत्सवाच्या कालावधीत भाविकांनी त्यांची वाहने, भामरे क्लासेस जवळ, GTP महाविद्यालय मैदान, डॉ . राजकुमार पाटील यांचे दवाखान्याचे पूर्व कडील ठिकाणी, BSNL कार्यालयाचे समोर याठिकाणी पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे . तसेच भाविकांनी त्यांची वाहने मंदिर परिसरात रस्त्यांवर किंवा इतरत्र पार्किंग केल्यास सदर वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन, पोलीस अधीक्षक श्री . पी . आर . पाटील यांनी केले आहे .
Users Today : 39