प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार शहादा येथील म्हाळसा मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव सुरू असल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सकाळी काकड आरती, सकाळीस साडे आठ वाजता व सायंकाळी साडे आठ वाजता आरती असते सायंकाळी साडे आठ वाजता नैवद्य आरती असते आरतीस विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक ,पत्रकार यांचा मार्फत आरती असते. सायंकाळ ची आरती संपल्यावर महिला भगिनी गरबा खेळतात. नुकतेच दिंडोरी प्रणित स्वामी सेवा केंद्र शहादा मार्फत मंदिरात दुर्गा सप्तशती पाठ वाचन करण्यात आले . पन्नास बायकांनी सामुदायिक पाठ वाचन केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात व भाविंकामध्ये भक्तीमय वातावरण तयार झाले असून नवचैतन्य निर्माण झाले आहे. पुन्हा मंदिर परिसरात अष्टमीला होम हवन करण्याचे नियोजन झाले असून नवमीस नवदुर्गा जेवू घातल्या जाणार असल्याचे नियोजन समितीकडून सांगण्यात आले आहे . कोजागिरी पौर्णिमेस मातेचा स्थापनेस तीन वर्ष पूर्ण झाले असून मातेची स्थापना पौर्णिमेस असल्याने मातेचा वाढदिवसाच्या दिवशी हवन होणार असून मोठा भंडारा आयोजित करण्यात आला आहे असे समीतीचे अध्यक्ष प्रा गणेश सोनवणे यांनी कळविले आहे . मातेचा दर्शनासाठी पहाटे पासून गर्दी होत आहे. दिवसभर भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असून मंदिर परिसरात गर्दी होत आहे. भाविकांनी दर्शनाचां लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर सेवा समिती मार्फत करण्यात आले आहे
Users Today : 25