डॉ.मुरलीधर खलसे-आदर्श विद्यालय चिखली येथे प्राविण्य वर्गाचे उद्घाटन संपन्न
स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे दरवर्षी वर्ग नऊ मध्ये 90% पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम सोबत त्यांना अधिकचे मार्गदर्शन मिळावे यासाठी अशा विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग म्हणजेच प्राविण्य वर्गाचे आयोजन दरवर्षी विद्यालयाच्या वतीने करण्यात येते शालेय कामकाजाव्यतिरिक्त अतिरिक्त तासिका घेऊन अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते विविध विषयांचे अध्ययन करण्यात येते आणि त्यांच्या गुणवत्तेमध्ये आणि एकंदरच त्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये कशी भर पडेल या दृष्टीने विचार करण्यात येते सदर प्राविण्य वर्गाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री समाधान जी शेळके सर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे उपप्राचार्य श्री प्रमोद जी ठोंबरे सर पर्यवेक्षक श्री जाधव सर व उपस्थित पालकांमधून पालक प्रतिनिधी श्री दयाल सिंग जाधव सोबतच विद्यालयाची ज्येष्ठ शिक्षक श्री रामेश्वर जी कुटे श्री विकाजी जाधव उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री रामेश्वर कुटे सर यांनी केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनामधून सदर प्राविण्य वर्गाची कल्पना आणि प्राविण्य वर्गामध्ये विविध विषय शिकवणारे सर्व शिक्षक यांचा परिचय सर्व उपस्थित पालकांना करून दिला सोबतच कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन म्हणून विद्यालयाचे उपप्राचार्य श्री प्रमोदजी ठोंबरे सर मार्गदर्शन करताना सदर प्राविण्य वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकास करावा आणि शैक्षणिक सत्र 2022 23 च्या येऊ घातलेल्या शालांत परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण मिळवून यशस्वी व्हावे यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालक यांना आवाहन केले आणि शुभेच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री समाधान जी शेळके सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणावर विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून विविध कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयांमध्ये करत असते सदर प्राविण्यवर्ग हा त्यातीलच एक भाग असून या प्राविण्यवर्गाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना दैनंदिन शालेय कामकाजाव्यतिरिक्त मार्गदर्शन करणार आहेत त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा लाभ घ्यावा असे आवाहन केले पालक प्रतिनिधी श्री दयालसिंग जाधव यांनी आपल्या मनोगत मधून आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्या पाल्याची काळजी करणारे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आदर्श विद्यालय यामध्ये आपली मुलं आहेत आपण सर्व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडवून आणावा असे सांगितले सदर प्राविण्य वर्गामध्ये इंग्रजी गणित विज्ञान या विषयांचे विद्यार्थ्यांना अधिकचे मार्गदर्शन मिळणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राविण्य वर्गाच्या संयोजिका सौ जोशी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विकास जाधव सर यांनी केले तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाच्या संयोजिका जोशी मॅडम सहसंयोजिका इंदु खेडेकर मॅडम व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले
Users Today : 22