राज्यस्तरीय पाचवे बहुजन साहित्य संमेलन – २०२२ चे चिखली येथे आयोजन !

Khozmaster
2 Min Read

उमा सुरडकर – चिखली:आपल्या साहित्य सौजन्याची झलक केवळ महाराष्ट्रातंच नव्हे….तर गोवा – गुजरात – दिल्ली पर्यंत पोचविणाऱ्या साहित्यिक मंडळींना हक्काचे विचार पीठ ऊपलब्ध करून देणाऱ्या बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने नियमित आयोजित होणाऱ्या बहुचर्चित साहित्य संमेलनाची परंपरा सातत्याने पुढे चालविण्यासाठी – ५ व्या राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलन – २०२२ चे आयोजन ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ असलेल्या चिखली नगरीमध्ये होत असल्याची अधिकृत घोषणा दि. २८ – ०९ – २०२२ रोजी बहुजन साहित्य संघाच्या बैठकीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. सदर संमेलन दि. २० – ११ – २०२२ रोजी येथील महाराजा अग्रसेन रिसाॅर्ट, चिखली, जि. बुलढाणा येथे संपन्न होत असून विविध साहित्यिक वैचारिक कार्यक्रमांची मांदियाळी त्यात असेल असे बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे यांनी या बैठकीत साहित्यिक व नागरिकांच्या माहिती साठी घोषित केले. तसेच लवकरच परंपरेनुसार संमेलन भूषविणाऱ्या विद्वत्जनांच्या नांवांची घोषणा सुध्दा करण्यात येईल असेही अध्यक्षांनी विषद केले. ही बैठक ब. सा. संघाच्या मान्यवर पदाधिकारी सचिव शाहीर मनोहर पवार, सुरेश अवसरमोल, गजानन जाधव, समयकुमार जाधव अंकुश पडघान यांच्या उपस्थितीत व दिल्ली येथील स्किल बुक सोहळ्यात सुप्रसिद्ध ऊज्जैनकर फाऊंडेशन, मुक्ताईनगर च्या वतीने आणि मा. प्रधानमंत्री यांच्या सह अनेक मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या व कोरोना काळात हजारो रूग्ण तथा त्यांच्या नातेवाईकांना भोजनाचे डबे नियमित पुरविणाऱ्या दानशूर अशोक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 

0 9 4 5 8 6
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *