देऊळगाव राजा : दत्ता हांडे- दिनांक 28 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने उपकार्यकारी अभियंता देऊळगाव राजा संदीप शेटे यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात म्हटले आहे की, मागील तीन वर्षा पासून सबंध देश भर कोरोनाने थैमान घातले होते त्यामुळे सर्वच सनावर बंधन होती, परन्तु यावर्षी सर्व काही सुरळीत असून देऊळगाव राजा तालुक्यामध्ये शहरी ग्रामीण भागात नवरात्र उत्सवात मोठ्या आनंदात साजरा केल्या जात आहे, या सन उत्सवामध्ये परिसर प्रकाशमय असणे शुभ मानले जाते, त्यामुळे या सणाच्या काळात वीज वितरण कंपनीने सुरळीत वीज पुरवठा ठेवावा तसेच सणासुदीचे दिवस असल्यामुळे थोड्या करमेसाठी वीज कापण्याची कारवाई करू नये.आज पासून नवरात्र सणाला सुरवात होणार आहे या काळात तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. महागाईमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे.यामुळे अनेक ग्राहकांनी थकीत वीज बिल मुदतीत भरलेली नाहीत, परिणामी त्यांची वीज जोडणी कापण्याची कारवाई ऐन सणासुदीत हातात घेऊ नये. जर ही कारवाई तालुक्यात सुरु असले तर ती त्वरित थांबवावी.तसेच तालुक्यात सण मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने व वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता बेहाल असताना वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी कापण्यात येत आहे. ही कारवाई त्वरित थांबवण्यात यावी. थकीत बिल भरण्यासाठी नवरात्र काळात ग्राहकांवर दबाव न आणता त्यांना वाढीव मुदत देण्यात यावी सक्तीने कारवाई करू नये ,तालुक्यातील गावपातळीवरील विद्युत पुरवठा हा अनियमित असून विजेचा खेळखंडोबा सुरूच आहे तरी देखील वाढीव दराने ग्राहकांच्या माथी वीज बिले मारली जात आहे. यावर विद्युत वितरण विभागाने त्वरित लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुचना द्याव्यात.आवश्यक ठिकाणी अधिक कर्मचारी तैनात ठेवावेत.संपूर्ण तालुक्यातील विद्युत यंत्रणेची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी तरी वरील सर्व बाबी लक्षात घेत सर्व कामे व्यवस्थित करून घ्यावी व नवरात्राच्या काळात वीज पुरवठा अखंडित सुरू राहील याची खबरदारी घ्यावी असे ही निवेदनात म्हटले आहे.याप्रसंगी सहाय्यक अभियंता तुषार नांद्रे,गुप्ता साहेब,उपस्तीत असून ग्राहकांनी शक्य होईल तेवढे बिल भरणा भरावा आम्ही सहकार्य करत सदर बिल भरणा करण्यासाठी मुदत देत हफ्ते पाडून देऊन असे सांगीतले, यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा सह सचिव बुलढाणा आदील पठाण,प्रमोद पाटील घोंगे ,शहर अध्यक्ष अरविंद खांडेभाराड,विशाल पवार,आकीब कोटकर, निलेश गीते,पंकज बैरागी, ऋषिकेश शेजुळकर,ज्ञानेश्वर डोईफोडे ,मा.वि. तालुका अध्यक्ष शाजेब कोटकर,समीर खान,हर्षल मोहिते,बलवन्त सिह बावरे,शांताराम भाग्यवन्त,शिवा वतपाळ,इ.स्वाक्षऱ्या आहेत.
Users Today : 11