
* प्रतिनिधी विशाल गवई अकोट*
*शाळकरी मुलांना आपला जीव मुठीत घेऊन करावा लागतो हा नाला पार*
अकोट तालुक्यातील महागाव 600ते 700 लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांना नाल्याला पूर आला की या गावचा तालुक्यांशी संपर्क तुटत असून.या लोकांची खूप मोठी जाण्या व येण्याची पंचायत होत असल्याचे चित्र आहे .परंतु नागरिकांना वेळेवर दवाखान्याचा उपचार न मिळाल्यामुळे काही लोकं चा मृत्यु झाला आहे. शाळकरी मुलांना तर त्यांचा जीव मुठीत घेऊन चक्क नाल्यात तुन जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे
परंतु आज पर्यंत ही कुण्या लोक प्रतिनिधी ने या गावाकडे लक्ष दिले नसल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे . तरी लोकप्रतिनिधीने या गावाकडे लक्ष देऊन पूल बांधून देण्याची मागणी नागरिक व शाळकरी मुले करीत आहेत…….
चौकट…….
आजही आम्हाला महागाव ते रुईखेड या रस्त्याने जाण्यासाठी या नाल्याला खूप मोठा पूर असतोच आणि आम्हाला शाळेतील मुलांना घरी व शाळेत नेण्याकरिता आमचा जीव मुठीत मुठीत घेऊन जावं लागतोच तरी शासनाने या आमच्या महागाचे रुईखेड नाल्यावरील पुल लवकरात करावा
रवींद्र भालतिलक महागाव नागरिक
रुईखेड व अकोट आम्हाला जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग असून
आमच्या गावातील दवाखाने नसून व आम्हाला आरोग्य सुविधांसाठी रुईखेड व अकोटला जावं लागते पण या नाल्यावरील पूल नसल्यामुळे
अनेक लोक या नाल्याला पूर असल्यामुळे मृत्युमुखी पडले आहे आता तरी शासनाने या रोडवरील पूल लवकर करून द्यावा
निलेश थोरात महागाव नागरिक
Users Today : 37