पातूर प्रतिनिधी
पातुर येथील रामनगर येथील सेवानिवृत शिक्षक किसनराव चव्हान यास अनोळखी दोन व्यक्तीने साहेब तुमचे पैसे पडले आहे असे सागुन चव्हान यांची मोटार सायकलवर ठेवलेले एक लाख रुपये घेऊन पोबारा केला. सविस्तर बातमी अशी की पातुर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतुन किसनराव चव्हाण यांनी तिन लाख रुपये काढले या तिन लाखापैकी दोन लाख मोटार सायकलच्या डिक्कीत ठेवले व एक लाख रुमालात बांधले .या वेळेस यांच्यावर चोरटे पाळत ठेवुन होते. चव्हान टिकेव्ही चौकाकडे मोटार सायकलने जात असतां दोन अज्ञात ईसमांनी त्याच्या कडील दहाच्या नोटा चव्हाण यांचे मागे फेकुन तुमचे पैसे पडले आहे असे सांगताच गुरुजीचा पैसे चा मोह आवरला नाही गुरुजीने तात्काळ गाडी फिरवुन दहाच्या नोटा जमा करण्याची धावपळ सुरु केली. गुरीजींचा मोह पाहता चोरट्यांनी रुमालात बांधलेले एक लाख रुपयाचे बंडल घेऊन पोबारा केला. सदर घटने नंतर गुरुजीनी पातुर पोलीस स्टेशन धाव घेतली व तक्रार दाखल केली गुरुजींच्या तक्रारीवरुन पातुर पोलीसांनी दोन अनोळखी व्यक्ती विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. शेवटी दहा रुपयाच्या नोटा जमा करण्यात गुरुजीना लाखाचा चुना लागला
Users Today : 37