भारत मातेच्या रक्षणार्थ अनमोल जीवनाचे २३ वर्ष समर्पित

Khozmaster
2 Min Read

पातूर प्रतिनिधी

पातूर शहरातील श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेत धडे घेवून भारत देशाच्या स्पेशल टास्क फोर्स (STF) सेनेत सलग २३ वर्ष आपल्या अनमोल जीवनातील अमुल्य वेळ देवून भारत मातेचे रक्षण केले असे हवालदार संजय रामभाऊ निमकंडे यांची भारतीय सैनिकी सेवा ३० सप्टेंबर २०२२ ला संपूर्ण होवून ते सेवानिवृत्त झाले आहेत.

१८ जानेवारी २००० CRPF मध्ये भरती होवून त्यांचे सुरुवातीचे ट्रेनिंग जम्मू काश्मीरच्या श्रीनगरला झाले.पहिली पोस्टींग ३० बटालियन पुलवामा येथे झाली तीथेच (STF) स्पेशल टास्क फोर्स (E30) मध्ये त्यांच्या कडून चांगली देशसेवा होत असतांना त्यांनी प्रशंसनीय अशी कौतुकास्पद कामगिरी बजावली.त्याचा परिणाम म्हणून पंजाबच्या चंदीगड येथे क्लोज प्रोटेक्शन टिममध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली.२००३ ते २००६ पर्यंत पंजाबचे तात्कालीन राज्यपाल जनरल जेकब व राज्यपाल ओमप्रकाश वर्मा यांचे सलग तीन वर्षे अंगरक्षक म्हणून उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडली.
२००६ ते २००९ छत्तीसगड मधील नक्षलग्रस्त भागात त्यांची नियुक्ती करण्यात आली.पुढे आसाम,महाराष्ट्र,झारखंडमध्ये ही नक्षलग्रस्त भागातच त्यांची पुर्ण काळ देशसेवा झाली.
स्पेशल टास्क फोर्स मध्ये काम करत असताना २००२ मध्ये जम्मू काश्मीरच्या सोपीयान गावात दडून बसलेल्या तीन विदेशी आतंकवाद्यांना कंठस्नान घातले,२००६ मध्ये छत्तीसगडच्या बासागुडा व डल्ला येथील जंगलात त्यांच्या ३० जवान असलेल्या पुर्ण टीमला त्या जंगलात दबा धरून बसलेल्या अंदाजे दोनशे नक्षलग्रस्तांनी यांना घेराव घालून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता या अचानक झालेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत कसोशीने त्या सर्व जवानांनी सामना केला त्यामध्ये त्यांच्या सोबत मागे पुढे चालत असलेले बटालियन मधील दोन जवान दुश्मनाच्या गोळींनी शहिद झाले होते.अशा कठीण प्रसंगी कडवट यशस्वी झुंज देत जखमी झालेल्या अवस्थेत नक्षलवाद्यांशी सामना करत एकाकी झुंज देवून दुश्मनांना पळताभुई केले होते.असे अनेक रोमांचक प्रसंग हवालदार संजय निमकंडे यांच्यावर येवून सुद्धा त्यांनी त्यांची २३ वर्षाची सेवा भारत मातेच्या चरणी समर्पित करून ते आता सेवानिवृत्त झाले.
०२ आक्टोंबर २०२२ ला त्यांचे अकोला रेल्वे स्टेशनवर दुपारी आगमन होत आहे.पातूर शहर वासीय तसेच जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे व पातूर शहरातून वाजत-गाजत त्यांची फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी त्यांचे वर्गमित्र व पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी यावेळी प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *