बोरगाव मंजू ब्लॉकचे तीस ते पस्तीस हजार रुपयांचे लोखंडी गेट चोरी..

Khozmaster
3 Min Read

डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ वणी रभापुर येथील

सी एस पी ओ राठोड साहेब यांचा भोंगळ कारभार

 

बोरगाव मंजू ब्लॉकचे तीस ते पस्तीस हजार ‌रूपयाचे लोखंडी गेट चोरी

 

 

 

दोन चौकीदार ड्युटीवर असताना सुद्धा तीस ते पस्तीस हजार रुपयाची गेट चोरी कसे गेले

 

प्रतिनिधी संतोष गवई अकोला

 

अकोला जिल्ह्यातील डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ सर्व जगात प्रसिद्ध म्हणून ओळखले जाते

याच विभागामार्फत डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ वनी रंभापुर सी एस पी‌ ओ यांचा भोंगळ कारभार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

काही महिन्यापासून डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ वनीरंभापुर येथून वादग्रस्त सुरेश महले यांची बद्दल मजुराने‌ तक्रार केल्याने सुरेश महले यांची वनी ब्लॉक वरून बोरगाव मंजू येथे तडकाफडकी बदली केली परंतु बोरगाव मंजू ब्लॉकचे इन्चार्ज सुरेश महले असून या ब्लॉक मधून ड्युटीवर चौकीदार सतीश अंभोरे अनिल इंगळे हे राञीचया वेळी हजर असताना तीस ते पस्तीस हजार रुपयाचे गेट चोरी गेले कसे हे नागरिक चर्चा करीत आहे

यावरून असं समजले जाते की इन्चार्ज सुरेश महल्ले तर ड्युटी करतच नाही परंतु चौकीदार सुद्धा कागदोपत्री ड्युटी करतात हे चित्र दिसून येत आहे गेट त चोरी गेले आहे परंतु जनावरांचा चारा सुद्धा चोरी जात आहे हे सुद्धा स्पष्टपणे चित्र दिसत आहे

गेट चोरी जाऊन आठ दिवस झाले असून सुद्धा अजून पर्यंत पोलिस कंप्लेंट केली नाही

 

यावरून असे चित्र दिसून येते की इन्चार्ज व चौकीदार सी एस पी ओ यांचाच काही घोटाळा दिसून येत आहे आता महत्त्वाचा विषय म्हणजे सुरेश महले हे बोरगाव मंजू ब्लॉक वर आल्यापासून

एकही दिवस बोरगाव मंजू ब्लॉकवर ड्युटीवर कार्यरत दिसत नाही फक्त कागदपत्री डिवटी दिसत आहे‌अशि

मजूर वर्ग चर्चा करीत आहे सुरेश महले यांची बोरगाव ब्लॉक मध्ये ड्युटी असून वनी ब्लॉकला दिसून येत आहेत अर्थातच राठोड साहेब व महले यांची हात मिळवणे दिसत आहे

बरेच वेळा गरीब मजुरांची छोटी मोठी चूक झाल्यास सी एस‌‌ पी ओ राठोड साहेबांनी त्यां गरिब मजुरावर कायदेशीर कारवाई करून त्यांना कामावरून काढण्यात आले या अगोदर सुद्धा सुरेश महले हे मजूर वर्गाला पैशाची मागणी करतात व मजुरा जवळुन मटणाची पार्टी खातात ‌‌यांची बातमी प्रकाशित झाली होती येवढच नाही या अगोदर सुद्धा पहाडपुर विभागामध्ये 50 एकर जमिनतील हरभरा व करडी पिकाचे नुकसान जंगली जनावरे यांनी वीस ते पंचवीस लाख रुपयाचे नुकसान केले होते त्यावेळेस सुद्धा इन्चार्ज वर कोणतीच कारवाई केली नाही

एखाद्या गरीब मुजरांनी छोटी मोठी चुक केली तर त्यां मजुरावर तात्काळ कारवाई केली जाते व गरीब मजुरांना कामावरून काढण्यात येते परंतु

  •  चौकीदार ड्युटीवर असताना गेट चोरी गेले कसे व पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला का नाही व कोणत्याही चौकीदारावर व इंचाजवर कारवाई झाली ‌का नाही कामावरून काढले का नाही अर्थात सी एस पी ओ राठोड साहेब व इन्चार्ज सुरेश महले चौकीदार सतीश अंभोरे अनिल इंगळे यांची मिली भघत स्पष्टपणे दिसून येत आहे तरी महोदय कुलसचिव कुलगुरू साहेब यांनी या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *