मुर्तिजापुर :- मूर्तिजापुर येथील जेष्ठ पत्रकार प्राचार्य विकास सावरकर यांना तालुक्यातील एजेएफसी पत्रकार संघटनेच्या वतीने तथा जेष्ठ पत्रकार प्रा . अविनाश बेलाडकर , प्रा. दिपक जोशी यांच्या उपस्थित आयोजित शोकसभेत आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विकास सावरकर म्हणजे पत्रकारीता आणि शिक्षण क्षेत्रातील वादळ होते , शिक्षक आणि पत्रकारांसाठी ते दीपस्तंभ होते. त्यांच्या निधनाने या दोन्ही क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचे मत या शोकसभेत बोलतांना जेष्ठ पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर यांनी काढले. जेष्ठ पत्रकार प्रा. दिपक जोशी, एजेएफसीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर, प्रा. एल. डी. सरोदे, अजय प्रभे, संतोष भांडे, समाधान इंगळे, मिलींद जामनिक, रोहीत सोळंके, संतोष माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शोक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एजेएफसी पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गणोरकर, प्रा अविनाश बेलाडकर, प्रा दिपक जोशी, अजय प्रभे, प्रा एल डी सरोदे, समाधान इंगळे, मिलिंद जामनिक, संतोष भांडे, संतोष माने, रोहित सोळंके, नाजुक खंडारे, प्रशांत चिंचोळकर, शाम प्रांजळे, अनील घुर्जड, नागोराव तायडे, शकील खान, निलेश कोर्दक, सेवकराम लहाने , भुषण महाजन, काशीब, धोत्रा गावचे सरपंच व उपसरपंच यांच्या उपस्थिमध्ये शोक श्रद्धांजली चा कार्यक्रम संपन्न झाला .