शहापूर / ठाणे)
एबीएम समाज प्रबोधन संस्थेमार्फत बाबरे ता. शहापूर जि- ठाणे येथे सन 1999 पासून फक्त कातकरी मुलांसाठी संस्थेने साक्षरता अभियान अंतर्गत प्रकल्प सुरू केला व अनेक आर्थिक अडचणींना सामोरी जाऊन तो टिकवला . त्यावेळी कातकरी समाजाचा साक्षरता दर 2 % पेक्षा कमी तर जवळ जवळ सर्वच कुटूंबे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत होती. आशा आदिम जमातीच्या समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही व म्हणून हा शैक्षणिक प्रकल्प सुरू केला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून सदरहू ठिकाणी फक्त आदिवासी कातकरी मुलामुलींची अनुदानित आश्रमशाळा मंजूर केली. संस्थेचे अथक परिश्रमाचे यश आहे असे प्रमुख पाहुणे माजी मंत्री जगन्नाथराव पाटील यांनी यावेळी सांगितले. सदरहू शाळा ही फक्त 10 वी पर्यत न राहता शासनाच्या सेवेमध्ये 12 वी पर्यत समकक्ष अभ्यासक्रम असल्याने उच्च माध्यमिकच्या मंजूरी साठी संस्थेने प्रयत्न करावे व महाराष्ट्र शासनाकडून आपण मंजुरी मिळवू असे जाहीर केले.
ज्या मुलांना त्यांच्या पाड्यापाड्यावरची भाषा वेगळी आहे. त्यांनी अस्खलित मराठीमध्ये स्वागत गीत गायले ते ऐकून प्रमुख पाहूणे सर्व उपस्थितांनी सर्व शिक्षक यांचे कौतुक केले. सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर अनेक गुणी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. या कार्यक्रमात( IIT Gold Medalist)
प्रवीण भालेसेन खास पुण्याहून आले होते.
संस्थेचे संस्थापक सीताराम गायकवाड यांनी कोविड काळ असताना शिक्षकांनी पाड्यापाड्यात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवले त्याचे कौतुक तर केलेच पण अध्यक्ष समीर गायकवाड व सचिव अतुल भडांगे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी 12000 चौ फूट शाळेच्या इमारतीचे बांधकाम केले त्याबद्दल धन्यवाद दिले.
या कार्यक्रम प्रसंगी (अध्यक्ष समाज न्याय कल्याण) डॉ. सोन्या पाटील , (एम . टेक आय. आय. टी. गोल्ड मेडिलिस्ट) प्रवीण भालेसेन, (संस्थापक व संस्थाप्रमुख ए. बी. एम .समाज प्रबोधन संस्था) सीताराम गायकवाड , ( अध्यक्ष ,ए. बी. एम .समाज प्रबोधन संस्था) समीर गायकवाड, (सचिव , ए. बी. एम .समाज प्रबोधन संस्था) अतुल भडांगे , ( मानवतावादी कवी लेखक) नवनाथ रणखांबे, (ए बी एम संस्थेच्या संचालिका ) शितल गायकवाड,(माध्यमिक चेअरमन ) पूनम भडांगे, ( माध्यमिक कार्यकारी चेअरमन) संतोष पडवळ, इ. मान्यवर उपस्थित होते. या शाळेच्या मुख्याध्यापिका आशा नवनाथ रणखांबे यांचा पोलिस , जिल्हास्तरीय महिला दक्षता कमीटीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी मंत्री जगन्नाथराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख संदिप पडवळ व योगिता जाधव यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रणखांबे यांनी सर्वांचे आभार मानले.
Users Today : 27