यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे हिंगणा येथे मकर संक्रांति निमित्त व्याख्यान )देवेंद्र सिरसाट.
नागपूर.
अनेक वेळा महिलांना वस्तू म्हणून वापर करतात आणि त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचेच दोष काढण्याचा पयत्न केला जातो. महिलांना दुलक्षित करण्यात येते त्यांच्या स्त्रीधानाचे जतन होत नाही कुटुंबाची आणि समाजाची प्रतिष्ठा जपण्यासाठी महिलांचा उपयोग केला जातो. तर अनेक वेळा महिलांच्या आरोग्याविषयी अधिकारांवर गदा आणली जाते. अशा अनेक प्रश्नांना महिलांना तोंड द्यावे लागते त्यासाठी महिलांनी स्वतःची हिम्मत वाढवून न्याय मिळविण्याकरिता कागदपत्राचे शस्त्र बाळगून लढणे गरजेचे आहे त्याचबरोबर महिलांनी आपल्या अधिकारबरोबर आपल्या कर्तव्याची सुद्धा जाण ठेवून कार्य करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ॲड स्मिता सरोदे-सिंगलकर यांनी केले ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान द्वारा मकर संक्रांतीच्या पर्वावर हिंगणा येथे आयोजित महिलांचे अधिकार व हक्क या व्याख्यानाच्या कार्यक्रमात मुख्य वक्त्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाला मुख्य वक्त्या म्हणून ॲड. स्मिता सरोदे- सिंगलकर, विशेष उपस्थिती म्हणून वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग होते.तर विचारमंचावर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, अरुणा सबाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे,जि. प. सदस्या वृंदा नागपुरे, रश्मी कोटगुले,उपसभापती उमेश राजपूत, राजाभाऊ टाकसांडे, राजेश जैस्वाल, संतोष नरवाडे,सुरेंद्र मोरे,पं.स. सदस्य सुनील बोन्दाडे, अभय महांकाळ, मंजुषा सावरकर, निलेश खांडेकर, प्रेमजी लोणावत,प्रकाश इटनकर, रवींद्र देशमुख, फतेपुरिया आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पर भाषण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्राचे अध्यक्ष महेश बंग यांनी, सूत्रसंचालन अरुणा बंग यांनी तर आभार रेखा घिये – दंडिगे यांनी मानले. कार्यक्रमाला हिंगणा तालुक्यातील शेकडो महिला उपस्थित होत्या. यशस्वीते करिता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले