गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा,
मंठा..शेतातील पिकाची अचूक नोंद घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शासनाकडून ई-पीक पाहणी अॅपची निर्मिती करण्यात आली. या अॅप मध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतात असलेल्या पिकांची माहिती भरून अपलोड करायचे आहे. खरीपाचा नोंदी नंतर आता रब्बीचा पिक पेरा नोंदणीसाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. तलाठी, मंडळ अधिकारी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.शनिवारी आकणी सज्जाचे तलाठी मौजे लिंबोना येथील शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन माहिती देऊन पिक पेरा नोंदणी करण्याचे आवाहन केले. गेल्या काही वर्षापासून प्रशासनाकडून ई-पीक पहानी हा उपक्रम सूरू केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा जेणे करून पुढे दूष्काळी अनुदान, पीक विमा, सरकारी मदतीसह विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शासनाच्याविविध योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा महत्वाचा आहे. शेतातील पिक पेरा नोंदणीसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. अनेक वेळेस सातबारावर एक आणि शेतात दुसरे पिक असल्याने सरकारी मदतीसह पिक विम्याला मोठी अडचण निर्माण होते. परिनामी अनेक शेतकऱ्यांना भरपाई पासून वंचित राहावे लागते. त्यामुळे सरकारने एका अप्लिकेशनद्वारे आता शेतकऱ्यांनी स्वत: च्या मोबाईल मधून सर्व माहीती भरता येणार आहे.त्यामुळे अचूक पिकाची नोंद सातबारावर होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदाच होणार आहे. या ई- पिक पहाणी मध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा कारण अजून वेळ गेली नाही येत्या 31जानेवारी पर्यंत नोंद करावी असे आवाहन तलाठी पी. पी. परवरे
यांनी केले पाहणी प्रसंगी सरपंच सत्यभामा रामेश्वर इंगळे.शिवाजी भोसले ( सदस्य) अशोक इंगळे , वैभव इंगळे, प्रल्हाद इंगळे, रामेश्वर इंगळे, जनार्धन इंगळे ग्रामपंचायत ऑपरेटर,तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.