प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: उपनगर पोलिसांनी गुन्ह्याचा तपासाकरीता पथके तयार करत तात्काळ तपास सुरु केला. त्यानुसार तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या किराणा मालाच्या वाहणावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याला यश आले आहे. किराणामालाच्या वाहनावर आरोपींनी दरोडा टाकला होता. पोलिसांनी चार आरोपींना नळवा आणि उमर्दे, खेरवी येथून अटक केली आहे. अधिक माहिती अशी कि,दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सचिन भगवान पाटील, (44 ) चालक , प्लॉट नं. 18(ब), शुभम पार्क, सहारा टाऊन, नंदुरबार हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुली-ओली फाटा जवळील खांडबाराकडे जाणाऱ्या रोडावर त्यांच्या मालकीचे वाहन क्र -: एम. एच.39 ए. डी.1133 या वाहणावरुन नंदुरबार शहरातील त्यांच्या नातेवाईकाचा किराणा दुकानाचा माल रुमकी तलाव ता. निझर जि. तापी येथून नंदुरबार येथे घेवून येत असतांना तीन मोटार सायकल वरील अज्ञात इसमांनी सचिन पाटील यांचे वाहन अडवून त्यांना खाली उतरवून अज्ञात आरोपीतांनी त्यांच्या दुचाकी मोटार सायकलवर बसवून वेडापावला गावा जवळ घेवून गेले व त्यांचे खिशातील मोबाईल जबरीने काढून घेतला. तसेच सदर घटने बाबत कोणाला काही सांगितले तर जिवेठार मारण्याची धमकी देवून पुन्हा गुली-ओली फाटा येथे आणून सोडले व त्यांच्या मालकीची सुमारे 7,00,000/- लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन क्र-: एम. एच. 39 ए. डी 1133 व त्यात असलेला 20,000/-रुपये किमतीचे साखरेचे पोते, तेलाचे डबे इत्यादी किराणा साहित्य जबरीने लुटुन नेला, म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 19/2023 भा.द.वि. कलम 395,341,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक किरणकुमार खेडकर तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे हे घटनास्थळी दाखल झाले. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर होता, म्हणून पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांना नाकाबंदी करणे बाबत सांगितले.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे वेगवेगळे पथक तयार करुन गुन्हा घडकीस आणून गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत आदेशीत केले.पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमी माहीती मिळाली की, दिनांक 21 जानेवारी रोजी गुली-ओली फाटा जवळील खांडबाराकडे जाणाऱ्या रोडावर झालेला दरोडा नळवे व खैरवा येथील, शातारामा वळवी, नितीन वळवी, अंकुश वळवी, हसन पाडवी यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने मिळून केलेला आहे. सदरची माहीती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना कळवून मिळालेल्या बातमी मधील संशयीतांना ताब्यात घेवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व त्यांच्या पथकाने नळवा, उमर्दे व खैरवी गावात जावून संशयीताचा शोध घेतला असता तेथे चार संशयीत आरोपी हे मिळून आले. शाताराम कांतीलाल वळवी (23 ) नितीन संजय वळवी (24 ) दोन्ही रा. नळवा ता. जि. नंदुरबार, अंकुश देवानंद वळवी (21) हसन विकास पाडवी ( 23) दोन्ही रा.खैरवा ता. नवापूर जि. नंदुरबार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याबाबत सविस्तर हकिगत सांगून गुन्ह्यातील जबरीने हिसकावून घेतलेला टाटा एस छोटा हत्ती चारचाकी वाहन तळोदा कडे जाणाऱ्या रोडावर सोडून दिला असे सांगितल्याने पथकाने तात्काळ तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्यातील चारचाकी वाहनाचा शोध घेतला असता सदरचे वाहन तळोदा पोलीस ठाणे हद्दीत बेवारस मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून त्यांच्या इतर साथीदारांची माहिती घेवून त्यांचा शोध घेणेकामी पथके गुजरात राज्यात रवाना करण्यात आले आहे. तसेच त्यांना देखील लवकरात लवकर बेडया ठोकण्यात येतील असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले. हि कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर .पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उप निरीक्षक प्रशांत राठोड, प्रविण कोळी, सहा. पोलीस उप निरीक्षक केशव गावित, वंतु गावित, अंकुश गावित, नारायण भिल यांच्या पथकाने केली आहे.
Users Today : 28