अन्यथा खुर्ची ताब्यात घेऊन ठिय्या आंदोलन”
बुलढाणा (19) – बुलढाणा तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकाने असेल आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून स्वस्त धान्य किंवा मोफत धान्य वितरीत करावे अशी योजना राबवून प्रत्येक नागरिकाला याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून शासन स्थरावर प्रयत्न चालू आहे. परंतु बुलढाणा तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकाने असून शासनाच्या योजनेतून अंतोदय,अन्नसुरक्षा बीपीएल, एपील पंतप्रधान योजने अंतर्गत धान्य मिळते परंतु हे स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्याचे ठसे दोनदोनदा घेवून माहित नसलेल्या योजनेची लुट करून लाभार्थ्याला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे. आणि यामध्ये तहसीलदार,पुरवठा निरीक्षक, DSO यांच्या संगनमताने स्वस्त धान्य दुकानदाराकडून हप्ते घेवून गोरगरिबाची लुट होत आहे आणि यामुळे अनेक नागरिकांना बाहेरून ४० रु किलोचे गहू विकत घ्यावे लागते एक तर ज्यांच्या नावावर एक एकर शेती सुद्धा नाही त्यांना मिळणारे एक हजार अनुदान सुद्धा शासनाने बंद केले आहे. शेत मालकाचे भाव पडलेले आहे आणि अश्याप्रकारे जे धान्य सरकार कडून मिळते ते सुद्धा यांच्या भ्रष्टाचारामुळे बंद होत असेल तर सामान्य माणसाने जगायचे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यांच्यावर कडक कार्यवाही करावी अन्यथा स्वाभिमानी च्या वतीने मा. तहसीलदार आणि ह्यातील कर्मचारी, अधिकारी यांच्या विरोधात तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला. यावेळी –
रफिक शेख,अमोल मोरे,महेंद्र जाधव, गजानन देशमुख.