खामगांव दि.२६-(उमाका) स्थानिक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर पालिका मैदानावर ७३ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्य मुख्य शासकीय ध्वजारोहन समारंभ 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 09.15 वाजता खामगांवचे प्रभारी उपविभागीय अधिकारी (महसुल) अतुल पाटोळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार ऍड.आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा,माजी आमदार नानाभाऊ कोकरे, माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, विठ्ठलराव लोखंडकार, शिवशंकर लोखंडकर, शेखर पुरोहित, सरस्वतीताई खासने, ऊर्मिलाताई शरद गायकी, सरूताई सेवक, ऍड.मनदीपसिंग शिख, मुख्याधिकारी मनोहर अकोटकर, नायब तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार हेमंत पाटील, निवासी नायब तहसीलदार पवन पाटील, नायब तहसीलदार गजनान बोरले, नायब तहसीलदार प्रदिप जाधव, गटशिक्षणािकारी एन. डी. खरात, उपमुख्याधिकारी सूर्यवंशी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, शासकिय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीसाकडून पथसंचलन करण्यात आले. खामगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी. आर. इंगळे यांनी पोलीस परेड कमांडर म्हणुन नेतृत्व केले. यानंतर देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.