तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देशाचे सर्वोच्च पदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही राजकीय घराण्यातील नेत्यांच्या नावाची शिफारस न करता अंदमान निकोबार वरील बेटांचे 21 परमवीर चक्रांनी नामकरण केले व सन्मान देऊन सैनिक परिवारास समजून घेतले आपण आपल्या स्तरावर सैनिकास समजून घेणार का?
आज काल लोकांना असं वाटतं की फौजीचं जीवन खुप छान आहे, पण वाटतं तितकं सोपं नसतं फौजीचं जगणं…. लोकांना फक्त त्याचा पगार दिसतो पण त्यामागे असणारे त्याचे देश प्रेम नाही दिसत,कधी कुठल्या क्षणी काय होइल ते नाही दिसत, स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव धोक्यात घालून कधी शञूच्या हातून एखादी गोळी लागुन जीवन समाप्त होईल हे सर्व माहीती असुनदेखील राञं—दिवस ड्युटी करण्यामागचे देश प्रेम अन त्याग नाही दिसत..लोकांना दिसतो तो फक्त पैसा. अरे जीवनात सगळे काही पैसाच नसतो हे त्यांना कोण सांगणार ? कारण लोकांचीना फौजी बद्दलची संकल्पनाच बदलली हो, ४-५ ए महीन्यांतुन सुट्टीवर असल्यावरून थोडेसे चांगले कपडे घालून गाडीवर फिरतांनी पाहीले की लगेच लोक म्हणतात फौजीची मज्जा आहे राव… गाडी, मोबाईल, पैसा असे बोलतात .. वरून सांगणार अरे कॅन्टीन किराणा अन् रम विस्की पण फूकट मिळते म्हणे, खरे पाहता फुकट नाही मिळत हो. आम्हाला पेसे द्यावे लागतात फक्त सवलतीच्या दरात कमी किमतीत वस्तु मिळतात एवढेच. सुट्टीवर आल्यावर कुणी जर भेटले ना तर कसा आहेस ते नाही विचारत लोक.अगोदर विचारतात ..आणली का ? नाही म्हणले ना तर लगेच म्हणनार तुझा तर काही उपयोगच नाहीरे. मिञांना जर समजले आहे तर लगेच म्हणनार चल यार पार्टी दे, २-४ वेळा दिली अन् एखाद्यावेळी नाही बोलले की लगेच मिञ पण टाळायला लागतात. नातेवाईकांना भेटलोना तेही लगेच म्हणनार पहील्यासारखा नाही राहीला, खूप बदलला अगोदर फोन करायचा आता नाही करत म्हणतात. अरे मग तुम्ही करायचाना एखाद्यावेळी. असे म्हणालो की लगेच म्हणनार तुझा नंबरच नाहीये किती नंबर बदलतो? वरून आपल्यालाच प्रश्न. एखाद्या मिञाने किंवा नातेवाईकांनी उसणवार घेतलेले पैसे वेळेवर नाही दिले अन् आपण जर परत मागितले ना लगेच म्हणनार अरे देतो ना काही पळून चाललो का? अन् तुला काय कमी आहे पैशांची? अरे असे कसे आम्हाला काहीच नाही करायचे का आमच्या— साठी? आम्हालाही आमचे जीवन आहे भाऊ . बाहेरच्या लोकांचे तर जाऊद्या पण घरातल्यांचेही तसेच असते. आपण घेऊन दिलेली मोटरसायकल कुठे फिरायला घेऊन निघालो तरी भाऊ सांगणार घरी येतांना पेट्रोल जास्त टाक जसे आम्हाला काहीच कळत नाही. लोक म्हणतात फौजीला दिमाग नसतो, फौजीचा मेंदू गुडघ्यात असतो, बाहेरचे तर म्हणतातच पण घरचेही म्हणतात तेव्हा वाईट वाटते कारण ज्या वयात लोकांची मुलं १० वी, १२ वी पास करुन काॅलेजमध्ये गाड्या उडवत पोरींमागे टवाळक्या करत फिरत असतात त्यावेळी माझा फौजी भर्तीचा सराव करत असतो,२-३ वेळा भर्ती करूनही भर्ती नाही झाला म्हणून थोडासा नाराज होतो पण पुन्हा त्याच जिद्दीने सराव करत तो भर्ती होतोच कारण मनात देशभक्ती, जिद्द आणि अंगात रग असते. काही आर्थिक अडचणीही असतातच. भर्ती होणारा प्रत्येक फौजी हा साधारण व गरीब कुटुंबातीलच असतात. श्रीमंत, जमीनदार, राजकारणी लोकांची मुले कधीच नसतात. लोक म्हणतात फौजीला मन, भावना काहीच नसतात, तो कठोर मनाचा असतो. चुकीचे आहे लोकांचे विचार. फौजीलाही मन, भावना असतात पण त्याला समजुण घेणारं कुणी नसतं. त्याच्यासारखे प्रेमळ कुणीच नसते पण त्याला आपले मन कठोर करावे लागते. सुट्टीवरून परत जातांना डोळ्यांतून वाहणारे अश्रू हसून लपवतांना, हात ऊंच करून घरच्यांचा निरोप घेतांना मनात किती रडतो त्याचे हे रडणे कुणालाच दिसत नाही. मंदिरातील घंटा कुणीही येऊन वाजवुन जाते तसे फौजीला कुणीही धोका देऊन निघुन जाते. मग ते प्रेमात असो की पैशांच्या व्यवहारात असो. तो मनातून खूप दु: खी असतो पण तो आपले दुःख कधी दाखवत नाही अन् लोक म्हणतात फौजीला मन नसते.
अहो एका फौजीला बाॅर्डर वर ड्युटी करतांना किती तरी अडचणींना सामोरे जावे लागते. उंचच उंच डोंगर चढतांना,पाण्याने दुथडी भरुन वाहणारे नदी नाले पार करतांना, साप, विंचू, जंगली प्राण्यांच्या भीतीने जीवाचा विचार न करता दिवस राञ घनदाट जंगलातून चालतांना स्वत:च्या जीवाचा विचार तो कधीच करत नाही. कारण मनात देशभक्तीचा जज्बा असतो. ज्यावेळी थंडीच्या दिवसांत तुम्ही लोक २-३ वाकळं घेऊन अंगावर पांघरुन घेऊन झोपलेले असतातना त्यावेळी माझा फौजी काश्मिरमध्ये -०डीग्री सेल्सियस तापमान असणार्या थंडीमध्ये हातात बंदूक घेऊन देशाचे अन् तुमचे रक्षण करत असतो, हॅन्ड ग्लोज शिवाय बंदुकीला हात लावला तर हात रायफलला चिकटतो एवढी थंडी ज्यावेळी तुम्ही लोक ऊन्हाळ्यामध्ये थोडेसे ऊन लागले, ऊष्णतेमुळे गरम होते म्हणून AC ची अन् पंख्यांची हवा घेत बसतातना तेव्हा माझा फौजी राजस्थानच्या वाळवंटामध्ये भारत पाक सीमेवर झळाया दिसतात तेथे हातात बंदूक घेऊन ऊभा असतो. आम्हालाही तुमच्यासारखे थंडीच्या दिवसांत अंगावर पांघरुन घेऊन झोपून रहावे वाटते, तुमच्यासारखे ऊन्हाळ्या मध्ये ऊष्णतेमुळे गरम होते म्हणून AC ची अन् पंख्यांची हवा घ्यावी वाटते पण आमच्या नशिबात ते नसतं. कारण शपथ घेतलेली असते हम *कसम खाते है आग पाणी हवा के रस्ते देश की रक्षा करेंगे* ऊन, वारा, पाऊस आणि येणार्या कुठल्याही संकटांमध्ये स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करील. पाकिस्तान सीमेवर असतांना आतंकवादी आणि छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांशी लढतांना कधी शञूची गोळी लागून मरण येईल,घर संसार आई वडील, बायको मुलं कधी उघड्यावर पडतील हे त्यालाही माहीती नसते अन् लोक म्हणतात फौजीची मज्जा असते. अहो एखादा फौजी शहीद झाला तर हे लोक अगोदर त्याच्या घरच्यांना किती पैसे मिळतील हा हिशोब करत बसतात.होळी, रक्षाबंधन, दसरा, दिवाळी हे सण तर फौजीच्या नशिबातच नसतात. दिवाळीच्या सणाच्या वेळी लहानशी मुलगी फोन करून म्हणते,”बाबा दिवाळीला घरी या,येतांना मला नविन कपडे घेउन या”मागच्या वेळी पण तुम्ही आले नव्हते. ३-४ वर्षांचा मुलगा म्हणतो “बाबा मला बंदुक , फटाके घेउन या” असे जेव्हा म्हणतो तेव्हा डोळ्यात पाणी येते कारण दिवाळीला सुट्टी मिळणार नाही हे माहीत असुनदेखील त्या फौजीला येतो असे सांगून खोटं बोलावं लागते. म्हातार्या आई वडीलांना वाटते आमचा मुलगा दिवाळीला येईल, बायकोला वाटते ५-६ महीने झालेत यावेळी नक्की माझा नवरा दिवाळीला येईल तेव्हा मग सगळे मिळून आनंदाने दिवाळी साजरी करु पण होते वेगळेच, आज येतो ऊद्या येतो असे करत करत दिवाळी जवळ येते पण सुट्टी मिळत नाही आणि ऐन् दिवाळीच्या दिवशी घरी फोन येतो तुमचा मुलगा आतंकवाद्यांशी लढता लढता शहीद झाला. हे ऐकून म्हातारी आई बेशुद्ध पडते, वडील गुडघ्यात डोकं घालून रडत बसतात, बायको चक्कर येऊन जमीनीवर पडते. क्षणभर काय चालले तेच कळत नाही. क्षणात होत्याचे नव्हते झाले. अरे अमूक अमूक फौजी शहीद झाला अशी बातमी क्षणात गावभर पसरते. सोशल मीडियावर जिकडेतिकडे वायरल होते लोक मोबाईल वरच श्रद्धांजलीचा वर्षाव करतात शेजारचे, गावचे लोक येतात आई बाप, बायकोची समजूत घालतात. लहानशी मुलं आई का रडते गं असे म्हणत चिमुकल्या हाताने जेव्हा तीचे डोळे पुसतात तेव्हा तर तीच्या अश्रूचा बांध फुटतो अन् त्या लहान पिलांना जवळ घेऊन ती जोरात हंबरडा फोडते पण त्यानंतर ती कधीच रडत नाही कारण आता तीला त्या मुलांचा आधार व्हायचे असते, आई आणि बाप दोघांची कर्तव्य तीला पार पाडायची असतात. शहीद झाला तो मुक्त अमर हुतात्मा होतो परंतु पाठीमागे राहिलेला छोटी छोटी मुलं आणि त्यांचा परिवार यांना शासन प्रशासन व नागरिकांकडून सुविधा मिळणे ही खरी श्रद्धांजली अर्पण होईल त्यांच्या स्मारकाच्या रूपातून अनेक देशभक्ती उपक्रम चालेल ही श्रद्धांजली त्या शहीद सैनिकास लागू पडेल. म्हातार्या सासू सासर्यांची जबाबदारी तीच्यावर असते. लहानशी मुलं कधी आजीकडे, कधी आजोबांकडे कधी आईकडे जातात. आपल्या घरी एवढी गर्दी का झाली हे त्यांना कळतच नाही. घरी आलेल्या माणसांना ते सांगत असतात आज ना आमचा बाबा येणार आहे, आम्हाला नवीन कपडे, फटाके आणणार आहे पण त्यांना काय माहीत की त्यांचा बाबा नाही त्याचे पार्थिव शरीर येणार आहे देशाची शान असणार्या तिरंगा मध्ये लपेटून.आजु बाजूचे लोक येतात आई बाप, बायकोची समजूत घालतात, सहानुभूती दाखवतात अन् निघुन जातात. सायंकाळ होते,आर्मीच्या फुल हारांनी सजवलेल्या गाडीमध्ये काही जवान त्या शहीद फौजीचे पार्थिव शरीर गावात घेऊन येतात, त्या पार्थिव शरीराची अंत्य याञा मिरवणूक करून काढतात,”भारत माता की जय, शहीद जवान अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद” चे नारे करत अंत्य याञा स्मशान भूमीकडे नेऊन त्या लहान ३-४ वर्षाच्या मुलाच्या हातून अग्निडाग दिला जातो.सर्व लोक आपल्या घरी निघुन जातात. गावात कुणाच्याच घरी दिवाळीचा सण साजरा करत नाही, सर्व गावकरी हे त्या शहीद फौजीच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झालेले असतात हे बघुन आज माञ त्या फौजीच्या आत्म्याला खर्या अर्थाने शांती मिळते .
कारण फौजीची मज्जा आहे असे म्हणनार्या लोकांना त्या फौजी बद्दल गर्व आणि अभिमान वाटत होता. ज्या फौजीच्या घरामध्ये दिवाळीला दिव्यांची ज्योत पेटणार होती त्या घरचा दिवा माञ कायमचाच विझून गेला होता. वृद्ध आई वडीलांचा म्हातारपणाचा आधार गेला होता, लहान मुलांच्या डोक्यावरचे पित्याचे छञ हरवले होते आणि ज्या पत्नीला ज्याच्या बरोबर सगळे आयुष्य घालवायचे होते तोच अर्ध्यावर साथ सोडून गेला होता. सगळेच दुःखामध्ये होते.
पण त्या फौजीचे काय? जो बाकी मुलांसारखेच मज्जा करायच्या दिवसांत सैन्यात भर्ती झाला होता. भर्ती झाल्यावर आई वडीलांचा आधार बनून लहान भाऊ बहीणीचे शिक्षण, त्यांचे लग्न, बायको मुलं तसेच नातेवाईकांचे घेणं—देणं सर्व काही करत होता. देशसेवा करतांनाच कुटूंबाचाही आधार तोच झाला होता. जो नेहमी इतरांसाठी आणि देशासाठी च जगला होता असा माझा फौजी दुसर्यांसाठी जगता जगता माञ स्वतः साठी कधी जगलाच नाही. म्हणून तर फौजी हा लाखात एक असतो…. अरे ” क्या लूटेगा जमाना हमारी खुशीयों को, हम तो खुद अपनी खुशीयाॅं दुसरों के ऊपर लूटाते है!” अशातच काही सैनिक पत्नीच्या विरहात वादग्रस्त परिस्थितीत जीवन जगत आहेत गैरसमज मुळे अनेक कोर्ट केस चालू आहेत आमच्या या लेखामुळे कोणाचं मन परिवर्तन होत असेल सैनिकाला जवळ करा तणावाने शहीद होण्याची संख्या वाढू देऊ नका व समाजातील शिंतोडे घेऊ नका जेव्हा यायचे तेव्हा नाही आली आणि आता कशी आली हे शब्द आयुष्यभर टोचत राहतील सैनिकमित्र फाउंडेशन ने आतापर्यंत कित्येक सैनिकांच्या पत्नी सैनिकांच्या घरी नेऊन घातलेल्या आहेत शर्थ एकच आहे गैरसमज दूर करून आपला अहंकार घमंड याला एक पाऊल पाठीमागे घ्यावे लागेल 80 5556 8866 सैनिक मित्र फाउंडेशन जय हिंद