मेहकर तालुक्यामध्ये बोगस घरकुलाच्या तक्रारी मध्ये वाढ

Khozmaster
2 Min Read

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे उपोषणचा इशारा सतिश मवाळ मेहकर : तालुक्यातील चार पाच वर्षे अगोदर बेघर अल्याचा सर्वे करून झाला असला तरी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचा  ठराव मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायत गावातील संपूर्ण लोकांची यादी गटविकास अधिकारी यांच्या कडे पाठवून दिले व नंतर त्री सस्तरीय समिती मार्फत फक्त कागदावर निवडप्रक्रिया पुर्ण करुन लाभार्थी ची निवड करण्यात आली अशी तालुक्यामध्ये चर्चा रंगत आहे ‌.प्रत्यक्षात ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी अधिकारी यांच्या कडे गावातील आठ अ नुसार पक्के कच्चे बांधकाम असलेल्यांची नोंद असुन ही पक्के बांधकाम असलेल्या लाभार्थी ची निवड करताना गावोगावी दिसत आहे.
व एकाच कुटुंबातील व्यक्तींना रमाई व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभ ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक सरपंच संगनमताने दिल्याचे  चित्र तालुक्यामध्ये वाढत आहे.त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सारशीव येथील ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सचिव यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचे जिओ टॉकिंग झालेले असतांना सुध्दा ग्रामपंचायतने ग्रामपंचायत ने खोटेनाटे ठराव घेवून, बोगस लाभधारकांना घरकुल मंजूर करण्यात आले. या संदर्भात ठराव ही घेण्यात आला आहे. त्यामुळे खरे लाभधारक डावलून बोगस लाभधारकांना लाभ देणा-या दोषी सरपंच व ग्रामसेवका विरूध्द कारवाई करावी अन्यथा पेनटाकळी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा गंभीर इशारा सारशीव येथील ख-या घरकुल लाभधारकांनी एका निवेदनाव्दारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे.
निवेदनात नमूद आहे की, सरपंच व ग्रामसेवक तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या संगनमताने खऱ्या घरकुल लाभधारकांना डावलून आधी घरकुल मिळालेल्या लाभधारकांना पुन्हा घरकुलाचा लाभ देण्याचा प्रकार सारशीवमध्ये केल्या गेला आहे. काही लाभधारक हे सारशीवचे मूळ रहिवासीही नाहीत. प्रधानमंत्री घरकुल योजनेचे जिओ टॉकिंग आधी झालेले असताना खोटे ठराव घेवून, लाभ देण्यात आला आहे. नियमानुसार घरकुला संदर्भात गावाता निवेदनाद्वारे गावकऱ्यांना सूचित करण्यात आले नाही. हा सर्व प्रकार व घरकुल लाभधारकांवर होणा-या अन्यायाची दखल घेवून, दोषी अधिकारी,  सरपंच ग्रामसेवकाविरूध्द कारवाई करावी अन्यथा पेनटाकळी नदी पात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा निवेदनात दिला असून निवेदनावर घरकुल लाभधारक विनोद सोमाजी जाधव, विजय कान्हे, स्वप्नील जाधव, संगिता ढोणे, सुजाता जाधव, कन्हैयालाल मोरे, प्रल्हाद शेजोळ, पंकज वाघ, नारायण ढोणे व चंद्रशेखर ढोणे यांच्या स्वाक्षऱ्या करून निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *