प्रतिनिधी
प्रविण चव्हाण दि.26
नंदुरबार -: जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमंलदारांच्या कल्याणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.
पो. अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देवून प्रजासत्ताक दिनानिमित्त पदोन्नतीची भेट देण्याची संकल्पना मांडली व तात्काळ मंत्रालयीन कर्मचारी यांचेकडून किती पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती दिली जाईल ? याची माहिती घेतली. तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांना तात्काळ पदोन्नती बाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मंत्रालयीन कर्मचारी यांचे कडून पदोन्नतीची कार्यवाही करुन पदोन्नतीस पात्र असणाऱ्या 05 अमंलदारांना आज दिनांक 26 जानेवारी रोजी स्वत: पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात उपस्थित राहणे बाबत कळविले.
पदोन्नतीस पात्र असणाऱ्या पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात बोलविले. पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात का बोलाविले असेल ? असा प्रश्न त्या पोलीस अंमलदारांना पडला, परंतु पोलीस अधीक्षक पाटील यांनी त्या 05 पोलीस अंमलदारांना पोलीस नाईक या पदावरुन पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती झाल्याचे सांगताच त्या सर्व पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगूणीत होवून त्यांचे चेहऱ्यावर हसू फुलले.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एकुण 05 पोलीस नाईक यांना सेवा जेष्ठतेनूसार पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देऊन प्रजासत्ताक दिनाची भेटच दिलेली आहे.
पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील पोलीस अमंलदारांना पोलीस अधीक्षक यांचे दालनात एक छोटेखानी पण दिमाखदार कार्यक्रम आयोजित करुन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पोलीस अमंलदारांना पोलीस हवालदार पदाचे फित लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळाल्यानंतर मिळणारे वेतन व भत्ते याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल. नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलीस अधिकारी व अमंलदारांचे देखील अडी-अडचणी व समस्या वेळेवेर सोडविल्या जातील. तसेच गैर कायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी व पदोन्नती मिळालेले अंमलदार इत्यादी उपस्थित होते.
पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झालेले पोलीस अमंलदार
पोना/हिरालाल मोंग्या पाडवी, धडगांव पोलीस ठाणे.
पोना/राजु धरमसिंग कोकणी, विसरवाडी पोलीस ठाणे.
पोना/भिमसिंग दामजी गावीत, पोलीस मुख्यालय, नंदुरबार.
पोना/राजेंद्र सदाशिव गावीत, मोलगी पोलीस ठाणे.
मपोना/गायत्री बापू पवार, पोलीस मुलख्यालय, नंदुरबार.
Users Today : 44