सावळदबारा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने ध्वजारोहण

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सावळदबारा यांच्या वतीने
 येथे २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थीनीं महापुरुष व महानस्ञीयांच्या वेशभुषा परीधान केले होते.ह्या विद्यार्थीनीने भारत मातेचा वेशभुषा परीधान केली होती.सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.प्रभातफेरी मध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर घोषणांनी परिसर दणाणून सोडला.नंतर मध्यवर्ती बँकेचे अधिकारी नामदेव चव्हाण व सुखदेव गवळे यांच्या
हस्ते प्रतिमा पुजन करून नामदेव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यांच्या सह ग्रामस्थ,पालक,माजी विद्यार्थ्यां,विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.याप्रसंगी बॅकेचे अधिकारी नामदेव चव्हाण,करतार चव्हाण, प्रदीप रोकडे, रत्नाकर उमरे व महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे अधिकारी मयूर सोनटक्के, काशीनाथ वावरे,शिवा जैस्वाल,शिपाई राम भडजी, पत्रकार बंन्धू जब्बार डी तडवी,रहीमखाॅन पठाण, पोलिस पा.विलास कुल्ले विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 3 7 8 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *