मोताळा
तालुक्यातील कोथळी येथे कौटुंबिक वादातून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून, याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.
बाळू सखाराम पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील सखाराम पाटोळे हे मोठ्या मुलाच्या घरी जाऊन नातू धिरज पाटोळे याने घरातून बाहेर काढल्याची माहिती देत होते. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांची पत्नी घराबाहेर उभे होते.
दरम्यान, फिर्यादीच्या पत्नीने “तुम्हाला कोणी बाहेर काढले?” असा प्रश्न विचारल्यानंतर वाद वाढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर सुपडा पाटोळे यांनी शिवीगाळ करत काठीने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच रेखा, प्रवीण आणि प्रेम पाटोळे यांनीही फिर्यादीच्या पत्नीला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून घटनास्थळी आलेल्या फिर्यादीच्या दोन मुलींनाही ढकलाढकली करून मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी संबंधित चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Users Today : 23