बुलडाणा, दि. 27 : जिल्हा रुग्णालयातील पीसीपीएनडीटी विभागात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयामध्ये या आठवड्यामध्ये जन्माला आलेल्या नवजात बालिकांना कपडे आणि पालकांना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुशील एस. चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मीन चौधरी, आरती कुळकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ तोडकर, प्रसुतीगृह प्रभारी श्रीमती डांगे, ॲड. वंदना तायडे, श्री. भोंडे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. चव्हाण यांनी समाजात मुलींच्या प्रती जागरुकता निर्माण करुन मुलींचा जन्मदर वाढविणे, तसेच मुलींच्या गर्भाची भ्रुणहत्या रोखून मुलींप्रती आदरभाव जोपासण्यात यावी, असा संदेश दिला.
Users Today : 18