बुलढाणा प्रतिनिधी शिवानंद पवार
देऊळगाव साकर्षा मागील वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये ICICI बँक लि. याच्या सहाय्याने स्थानिक संस्था सावित्रीबाई फुले महिला मंडळ देऊळगाव साखरशा वतीने मृदा व जलसंधारण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. मृदा व जल संधारणाचे काम मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा, वडाळी व पारखेड येथे करण्यात आले. या गावामध्ये नाला खोलीकरण व रुंदीकरण (डोह पद्धती), बंधीस्ती व शोष पिट (पाणी पुनर्भरण खड्डा )अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी आय सी आय सी आय बँक लि. चे प्रकल्प संचालक श्री जोकीम कोलाको यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थिती चा आढावा घेतांना शेतकऱ्यांसोबत संवाद साधला
नाला खोलीकरण व रुंदीकरण हे डोह पद्धती केल्यामुळे यामुळे झालेले फायदे शेतकऱ्यांनी सांगितले शेतातील व आजूबाजूच्या परिसरातील पाणी नाल्याच्या पात्रात जमा होते व पाण्याचे जमिनीमध्ये पुनर्भरण होते शेती चिबडणे थांबते.

नाला खोल झाल्यामुळे नाल्याचे पाणी शेतात फुटत नाही शेती व खरडून जात नाही त्यामुळे अर्ध्या ते एक एकरातील पिकांमध्ये नुकसान टळते पर्यायाने शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते जंगली जनावरा पासून शेतीचे संरक्षण होते बांधबंधिस्ती व रिचार्ज पेठ मुळे शेतातील गाळ वाहून जात नाही व पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीमध्ये मुरते त्यामुळे स्थानिक परिसरातील विहिरीच्या पाण्या ची पातळीत वाढ होते या सर्व उपक्रमांमुळे या वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा 20 ते 50 हजारापर्यंत उत्पन्नात वाढ झालेली आहे. याच प्रसंगी शेतकऱ्यांनी केलेल्या कामाची शाश्वतता टिकवण्यासाठी चे आश्वासन दिले व आयसीआयसी बँक व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांचे मनापासून आभार शेतकऱ्यांनी मानले.

संस्थेचे अध्यक्ष सौ आशाताई देशमुख यांनी संस्थेच्या इतर उपक्रमाबाबत माहिती दिली तर प्रकल्प संचालक नरेंद्र पवार यांनी सदर कामे करत असताना आलेल्या अडचणी वर मात करण्याकरिता संस्थेने तंत्रज्ञ व्यक्ती विनोद गुजलवार यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले व सोबतच या कार्यक्रमातून तयार झालेल्या काही यशोगाथा श्री जोकीम कोलाको यांना वाचून दाखवल्यात जोकीम कोलाको सरांनी सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांचे संचालक मंडळ व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना झालेले काम अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने व गुणवत्तापूर्वक केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झालेला आहे व पुढील काही वर्ष शेतकऱ्यांना याचा फायदा होत राहील याबाबत समाधान व आनंद व्यक्त केला व पुढील बाळापुर व मेहकर येथील कामासाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे संचालक सौ पुष्पाताई गायकवाड, प्रभावातीताई पाटील, विजयाताई पवार, जयश्रीताई जैन, सुलभाताई देशमुख, सौ रुपाली पवार, स्नेहाताई गायकवाड व सर्व संचालक मंडळ व श्री विकास कटारे, पंडित पवार, संदीप देशमुख, ऋषी ठाकरे, अभिजित देशमुख, मुकुंदा देशमुख, अभिजित शिरपूरकर उषा चनखोरे, दिलीप ढवळे, ज्ञानेश्वर लकडे, श्रीमती इंदूताई पवार, किसनलाल शर्मा उपस्थित होते,
Users Today : 19