प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार – शहरातील बालवीर चौकात
भारतीय प्रजासत्ताकदिनी भारत माता पुजन आणि ध्वजारोहण करण्यात आले.
यंदा माजी नगरसेवक किरण नामदेव चौधरी यांना तिरंगा ध्वजारोहणाचा
मान देण्यात आला.हुतात्मा शिरीष कुमार मेहता यांच्या प्रतिमेस शालेय विद्यार्थी संस्कार किरण चौधरी याने पुष्प अर्पण केले.
कार्यक्रमास मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मंगा चौधरी, सेवानिवृत्त अधिकारी दिलीप जोशी, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या सह परिसरातील शालेय विद्यार्थी महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय..
वंदे मातरमच्या घोषणाा दिल्या.
Users Today : 19