जव्हार प्रकल्प कार्यालयात वस्तु विक्री स्टाॅलचे उदघाटन.

Khozmaster
1 Min Read
पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी 
आदिवासी विकास आयुक्तालय,नाशिक यांच्या  निर्देशान्वये जव्हार प्रकल्प कार्यालयामध्ये स्टॉलचे उदघाटन  26 जानेवारी,2023 रोजी करणेबाबत निर्देशीत केले आहे.त्यानुसार 26 जानेवारी,2023 या दिवसाचे औचित्य साधुन प्रकल्प कार्यालय,जव्हार येथे आदिवासी कुटुंबांनी /लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तु, संस्कृतीशी निगडीत साहित्य /वस्तु विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले,व वस्तु साहित्य विक्रीसाठी कायम स्वरुपी कलादालन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले. सदरच्या कार्यक्रमास मा.आयुषी सिंह,(भा.प्र.से.) प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, व मा.विजय मोरे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी, तसेच कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते, सदरच्या उपक्रमात बचतगट व वैयक्तिक लाभार्थ्यांनी भाग घेतले असून,कार्यलयीन कर्मचाऱ्यांनी खरेदीसाठी चांगले प्रमाणात प्रतिसाद दिले.
0 8 9 4 6 2
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *