वांगरगाव येथे किसान गोष्ठी दिन कार्यक्रम संपन्न

Khozmaster
1 Min Read
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी दिनांक 27/1/2023 रोजी मौजे वांगरगाव ता.तेल्हारा येथे  मा.श्री डॉ. मुरली इंगळे साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला, मा. श्री आरिफ शहा साहेब प्रकल्प संचालक आत्मा अकोला, मा. श्री नरेंद्र राठोड तालुका  कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली कृषी विभाग , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) अंतर्गत किसान गोष्टी/ क्षेत्रिय दिन कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्र अकोला चे मा.श्री कुलदीप देशमुख साहेब यांनी रब्बी पीक व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यामध्ये हरभरा व गहू पिकाविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी श्री प्रवीण मार्के , श्री भास्करराव मार्के (प्रगतशील शेतकरी ) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.   श्री आर. एस.माळी  कृषी पर्यवेक्षक यांनी कृषी विभागाच्या योजना, व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष अंतर्गत  रोजच्या आहारात कडधान्यचे महत्व याबाबत सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   दिपक मोगरे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले व आभार प्रदर्शन  श्री एम.डी.ठोबरे कृषी  सहाय्यक यांनी केले .
0 9 3 7 8 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *