अल्पवयीन घरफोडी करणारे दोघे युवक : 24 तासाचा आता शहादा पोलीसांच्या ताब्यात, दिड लाखाचा मुद्देमाल हस्तगत.

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी प्रविण  चव्हाण नंदुरबार  -: घरफोडी करणारे दोघे अल्पवयीन 24  तासांच्या आत शहादा पोलीसांच्या ताब्यात, 1 लाख 33 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी की, 24 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते सांयकाळी 5. वा. दरम्यान श्रीमती अनिता देविदास मराठे यांच्या शहादा शहरातील विजय नगर येथील घराच्या दरवाजाचे कुलुप अज्ञात आरोपीतांनी तोडुन 3 हजार रु रोख व 1 लाख 32 हजार 300 रु कि. सोन्याचे दागिने असा एकुण 1 लाख 35 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द् भा.दं.वि. कलम 454,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      शहादा शहरातील विजय नगर सारख्या परिसरात दिवसा झालेल्या घरफोडीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती.   सदर घटने बाबत शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सदर घटनेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व इतर अधिकाऱ्यांना तात्काळ कळविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नंदुरबार अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्याचे 3 वेगवेगळे पथके तयार करुन गुन्हा घडकीस आणून गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेश दिले.
    25 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा शहरातील विजय नगरमध्ये झालेली चोरी शहादा शहरातील श्रमीक नगर परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी केली असल्याची बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना सांगितली. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी शहादा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना सदरची माहिती सांगून संशयीत अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून विचारपुस करण्याबाबत आदेश दिले.
     शहादा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी तात्काळ मिळालेल्या माहिती मधील दोन अल्पवयीन मुलांची माहिती काढली असता, ते घरी असल्याचे समजले. पथकाने अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांसमोर ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारून विजय नगर येथील चोरी बाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरची चोरी केली असल्याचे सांगितले. म्हणून त्यांना चोरी केलेले सोन्याचे दागिने व पैसें कोठे आहे ? याबाबत विचारले असता त्यांनी घरात ते लपवून ठेवल्याचे सांगितल्याने 1 लाख 32 हजार 300 रु कि. सोन्याचे दागिने व 1 हजार 100 रुपये रोख असा एकुण 1 लाख 33 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्य मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, पोलीस उप निरीक्षक जितेंद्र पाटील, पोलीस नाईक संदीप लांडगे, मुकेश राठोड भरत उगले, किरण जिरेमाळी, अजित नागलोत यांच्या पथकाने केली आहे.
0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *