नंदुरबार बसस्थानकावर महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघातर्फे रथसप्तमीनिमित्त आयोजित

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण 

नंदुरबार -:  ग्राहक पंचायतचे संस्थापक अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व.बिंदूमाधव जोशी प्रणित महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुका शाखेतर्फे रथसप्तमीनिमित्त नंदुरबार आगारातील चालक वाहकांचा सन्मान आणि प्रवाशांना तिळगुळ वाटप करून रथसप्तमी उपक्रम साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम ज्येष्ठ वाहक पी.टी. कोकणी यांच्याा हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी ग्राहक पंचायतीच्या नंदुरबार तालुका अध्यक्षा अबोली चंद्रात्रे, प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, यांच्या हस्ते नंदुरबार आगारातील चालक- वाहकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार, वाहतूक निरीक्षक आर.जी. वळवी, डी.बी. सूर्यवंशी, नियंत्रक विश्वास बागुल, आर. आर. कोकणी, ललित सूर्यवंशी, वाहक दिपाली मराठे, प्रवासी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष डॉ. गणेश ढोले, संघटक योगेश्वर जळगावकर, बी. डी. गोसावी, गोरखनाथ बाबा, वासुदेव माळी, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी नंदुरबार बसस्थानकावरील प्रवासी आणि विद्यार्थ्यांना तसेच रिक्षा चालकांना तिळगुळ वाटप करून रथसप्तमीचे महत्व सांगण्यात आले.

नंदुरबार बसस्थानकावर महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघातर्फे रथसप्तमीनिमित्त आयोजित उपक्रमाप्रसंगी उपस्थित अबोली चंद्रात्रे, महादू हिरणवाळे, बी.डी.गोसावी, योगेश्वर जळगावकर, विश्वास बागुल, ललित सूर्यवंशी आदी.

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *