प्रविण चव्हाण
नंदुरबार -: ३१ जानेवारी रोजी दुपारी नवजीवन एक्सप्रेस ट्रेन (क्र. १२६५५) मधुन जाणाऱ्या एका प्रवाशाला नंदुरबार जवळ अचानक हृदयविकाराचा झटका आला होता.
गाडी नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहचताच रेल्वे पोलीसांनी तात्काळ धाव घेत रुग्णवाहिकेला बोलावून रुग्णाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने रुग्णाचा जीव वाचला. नंदुरबार रेल्वे पोलीसांनी माणूसकीचे दर्शन घडविल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी नवजीवन एक्सप्रेस ट्रेन (क्र. १२६५५) मध्ये जनरल बोगीत श्रीनिवास नरसिया कस्तुरी (वय ४८, रा. उधना, सुरत) हे पत्नी तेजस्वीनी व मुलगी लक्ष्मी यांच्यासोबत वारंगल ते सुरत प्रवास करत असतांना प्रवास करत होते.
नंदुरबार रेल्वेस्थानक जवळ येत असतांना अचानक श्रीनिवास कस्तूरी यांच्या छातीत कळा येवू लागल्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे माहिती मिळताच रेल्वेतील अधिकाऱ्यांनी तात्काळ स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. याबाबत नंदुरबारचे स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलीसांना कळविताच गाडी येण्याआधी रेल्वे
पोलीसांनी प्लॅटफार्मवर धाव घेतली. रुग्णवाहिकेला तात्काळ पाचारण करण्यात आले.
पोलीस हवालदार प्रकाश गोसावी, रवी पाटील व पोलीस नाईक विशाल कातीलकर यांनी श्रीनिवास कस्तूरी यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेले.
वेळीच रुग्णालयात नेल्याने श्रीनिवास कस्तूरी यांचा जीव वाचला त्यामुळे श्रीनिवास यांचा पत्नी
तेजस्वीनी व मुलगी लक्ष्मी यांनी पोलीसांना धन्यवाद दिलेत.
दरम्यान, रेल्वे पोलीसांनी माणूसकीचे दर्शन घडविल्याने त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
Users Today : 20