दिव्यांग गणेशच्या पंखात भरलं शिवसेनेने बळ..

Khozmaster
4 Min Read

 

नंदुरबार, दि.2 फेबुवारी,2023

प्रविण चव्हाण जिल्हा प्रतिनिधी दैनिक खोज मास्टर न्यूज नंदुरबार..

नंदुरबार -: घरात अठरा विश्व दारीद्र्य, अशातच जन्मापासुन दोन्ही हाताने अपंग आणि त्यातही अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकल्या वयात आई घर सोडुन गेली. तरीही या विपरीत परिस्थीतीमध्ये शिक्षणाची प्रबळ इच्छाशक्ती असलेला एक गणेश आपल्या अंपगावर मात करत आयुष्याचा लढा लढत आहे. त्याच्या जगण्याच्या जिद्दीची ही कहाणी वेगळीच आहे.

असलोद तालुका शहादा गावात राहणाऱया गणेश अनिल माळी या आठ वर्षीय विद्यार्थ्यांची जीवनसंघर्षाची ही कहाणी. आठ वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात ही दैवाने काय संघर्ष उभा थाटला, गणेश च्या आयुष्याची कहाणी ही आनंदी जीवन जगणाऱ्या बालकांपेक्षा औरच आहे. त्याच्या जगण्याच्या हा संघर्ष पाहुन आपल्या डोळ्यातही अश्रु आल्या खेरीज राहणार नाही. अत्यंत निरागस आणि पाहिल्यासोबत मोहीत करणाऱया आठ वर्षाचा गणेश आनंद माळी हा जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकतो. मात्र, नियतीने या गोंडस चेहऱयाशी अनियती केलीय, हे मात्र नक्कीच. या आठ वर्षाच्या गणेशला जन्मापासुन दोन्ही हातच नाहीत. तरी त्यांची जगण्यासोबतची लढाई काही कमी झालेली नाही.

जन्मतः दोन्ही हात नसलेला गणेश हा असलोद तालुका शहादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी असून कोवळ्या वयात त्याचे पाय त्याचे हात झाले आहेत व कष्टाने पायावर उभा राहणारा हा चिमुकला या भागात सध्या चर्चेसह आसपासच्या मुलांना प्रेरणा देणारा ठरला आहे .
त्याला हात नसतांना देखील त्याने वयाच्या अवघ्या आठ वर्षात आपल्या अंपगत्वावार मात करत शिक्षणासाठी घेतलेली भरारी भल्या भल्यांना अंचंभीत करणारी आहे. काही कौटुबीक कारणास्तव लहानग्या वयात आई घर सोडुन गेल्याने गणेशच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याचे वडीलच सांभाळत आहे. सकाळी चार वाजता उठुन त्याचे वडील त्याच्या नित्यचर्येसाठी त्याल मदत करत आहे. मग घरी तयार होवुन शिक्षणासाठी गणेश जिद्दीने शाळा गाठत आहे.
विशेष म्हणजे गणेशला हात नसल्याने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तो पायाने अक्षर गिरवण्याच काम करत आहे.वर्गातल्या हुशार मुलांमध्ये त्याच्या समावेश आहे लिहिता यावे यासाठी कोणाची मदत न घेता हे पायांनाच हातांचे बळ देत लिहिण्याची कला त्याने अवगत केली आहे .पायाने लिलया लिखानासोबतच तो मोबाईल देखील त्याला सहजरीत्या पायाने चालविता येतो. मोबाईल वरील विविध ॲप्स तो सहज वापरतो . जेवणाचा प्रश्न म्हणाल तर मग याच पायाच्या सहाय्याने अन्न मळून पायनेच चमच्याचा सहाय्याने त्याला खातांना पाहील्यास त्याच्या संघर्षाची अनुभुती सर्वांनाच होईल. तर वर्गातील अन्यमित्रही त्याच्या दिनचर्येसाठी त्याला मदत करतातच. या कोवळ्या वयातही त्यांची शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्यांच अपंगत्व अडवू शकलेले नाही.

शिक्षणासोबत खेळातील त्यांची आवड आणि मैदाणातील त्याची चपळता भल्या भल्यांना आवाक करणारी आहे. पण घराच्या अठरा विश्व दारीद्र्यात तो आणखीन किती तग धरणार हा गंभीर प्रश्न त्याच्या शिक्षकांसह गावातील त्यांच्या शुभचिंतकांनाही भेडसावत आहे. वडील मोल मजुरी करुन कसाबसा कुटुंबाचा गुजारा करत असल्याने आजी आजोबांच्या देखरेखीखाली राहणाऱया गणेशला शासन स्तरावरुनच कृत्रीम अवयवांसाठी आणि त्यांच्या जीवनाच्या लढाईसाठी मतदीची अपेक्षा त्याचे प्रत्यक्षदर्शी करीत आहेत.

बुद्दी आणि जिद्दीचा धनी असलेला हा गणेशची आर्थिक झोळी खाली असली तरी, त्याचा जगण्याचा हा संघर्ष अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. चिमुकल्या वयात मायेची ममता मुकलेल्या या गणेशला आता आपल्या मदतीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे मायबाप सरकारने पुढे येवुन त्याच्यासाठी कृत्रीम अवयवांचा बंदोबस्त करुन दिल्यास त्याला मोठा आधार होईल. आत्ता त्याला शिक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख अरुण चौधरी यांनी उच्च शिक्षणा पर्यंत दत्तक घेत मोठे पाठबळ दिले आहे , त्यामुळे गणेश आगामी काळात इतरांसांठी प्रेरणादायी लढाच ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *