निलेश अहेर : जिल्हा प्रतिनिधी
दि.३ शहादा (नंदुरबार)
तळोदा तालुक्याचे माजी उपनगराध्यक्ष योगेश चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी, तळोदा येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष भाजपा विजय चौधरी, शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, सचिव-पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रभाकर चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, नगरसेवक गौरव वाणी, नगरसेवक रामानंद ठाकरे, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच, उपसरपंच भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ३०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
Users Today : 16