योगेश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन, जिल्हाध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन..!

Khozmaster
1 Min Read

निलेश अहेर : जिल्हा प्रतिनिधी

दि.३ फेब्रुवारी २०२३ (नंदुरबार)

तळोदा तालुक्याचे भाजपा शहरध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष योगेश चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने तळोदा येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ४५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

याप्रसंगी प्रदेश महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष भाजपा विजय चौधरी, शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रभाकर चौधरी,ज्येष्ठ संचालिका रत्ना चौधरी, नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, नगरसेवक गौरव वाणी, नगरसेवक रामानंद ठाकरे, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच, उपसरपंच भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रक्तदानपेटीचे संचालक डॉ.किशोर लालचंदानी यांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितले की,आज पर्यंत अशा कोणत्याच कार्यक्रमात कोणीही रक्तदान केले नाही, एका दिवसात ४५५ रक्तदानीं रक्तदान केले. रक्तदान संकलन करण्याचा हा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात ऐतिहासिक रक्त संकलनाचा विक्रम झाला आहे.

योगेश चौधरीच्या वाढदिवसा निमित्ताने तळोदा नगरपालिकेत कार्यरत असलेल्या ८० सफाई कामगार बंधू-भगिनींना कपडे वाटप करण्यात आले. यात ५० पुरुष व ३० महिलांचा समावेश होता. पुरुषांना स्नेहरुपी ड्रेस व महिलांना साडी वाटप करण्यात आले.

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *