बोरद येथे माहाआरोग्य शिबिराचे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन !

Khozmaster
1 Min Read

 

निलेश अहेर : जिल्हा प्रतिनिधी

दि.९ (नंदुरबार ) : तळोदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोरद येथे मोफत आरोग्य तपासणी,जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानाचा शुभारंभ व महाआरोग्य शिबिराचे शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी जि.प.सदस्य सुनिता पवार, पं.स.उपसभापती विजयसिंह राणा, पं.स.सदस्य दिवाकर पवार, सरपंच अनिता भिलावर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती पावरा, डॉ.पंकज पावरा, डॉ.अरुण लांडगे, एच.ए. पिंजारी नाना, मानसेवी वैद्यकीय अधिकारी माधुरी पाटील, आरोग्य सहायिका अरुणा चौधरी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, नर्स, परिचालक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस गावातील व परिसरातील सर्व नागरिकांना सह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महाआरोग्य शिबिरात ० ते १८ वर्ष वयोगटातील सर्व बालकांचे मोफत आरोग्य तपासणी, हिवताप, ईसीजी, टीबी, गप्पी मासे, अशा या विविध आजारांचे चेकप करण्यात आले. आमदार पाडवींनी मार्गदर्शन करतांना आपले व आपल्या बालकांचे आरोग्य कसे सुदृढ राहावे, आरोग्य विषयी घ्यावायची काळजी, आपल्या परिसरातील आरोग्य कसे चांगले राहील, व योजनेच्या माध्यमातून ही आपल्याला उपचार करता येईल.

अशा विविध योजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *