निलेश अहेर : जिल्हा प्रतिनिधी
दि.११ शहादा (नंदुरबार)
शहादा तालुक्यातील गणोर, टवळाई येथे डी.एस.सी.संस्था, ॲक्सिस बँक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टवळाई परिसरातील गावा लागत नाला खोलीकरण, शेत सपाटीकरण ह्या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. अगदी स्तुत्य असा हा उपक्रम असुन अल्प व सिमांत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, मृदेचे संवर्धनातून शेतीपुरक, सिंचन, पाणलोट, जलसाधारण, भू-जल अशा इत्यादी गोष्टींचा शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी फायदा होणार आहे.
या प्रसंगी टवळाईचे सरपंच प्रकाश पवार, पोलिस पाटील मोग्या पवार, सरपंच विठ्ठल ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी डी.एस.सी संस्थेचे टेक्निकल इन्चार्ज बनसोडे, अभियंता दिग्विजय शर्मा, टिम लिडर कल्पेश पटेल, सामाजिक तज्ञ संदिप कोळी, राहुल रावताळे व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
Users Today : 12