सुरत-भुसावल पॅसेजर मध्ये पाळधी येथे चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवुन १७ हजार रुपये लाबवले!

Khozmaster
2 Min Read
नंदुरबार रेल्वे पोलीसांनी तिघा चोरट्यांना ४८ तासात ठोकल्या बेडया !
प्रविण चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी )
12 फेब्रुवारी 2023
नंदुरबार -: सुरत-भुसावळ लोहमार्गावर पाळधी येथे सुरत-भुसावल पॅसेजर मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवुन घटना घडली.
    याप्रकरणी नंदुरबार रेल्वे पोलीसांनी तीघांना अटक केली आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार ते भुसावळ दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे ८ जानेवारी रोजी प्रकाश वामन पाटील रा. वेलसवाडी, ता. जळगांव व विलास संपत जंगले रा. मालदाभाडी ता.ता.जामनेर हे सुरत भुसावल पॅसेजरने प्रवास करीत असतांना पाच जणांनी दोघांना चाकूचा धाक दाखवत तारहाण करीत प्रवाश्यांकडून १७ हजार रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड हिसकावून घेत फरार झाले होते, त्यानंतर नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्यात, याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध प्रकाश वामन पाटील यांच्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलीस स्टेशन नंदुरबार येथे भादवी कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या अनुषंगाने रेल्वे पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लोहमार्ग पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते, लोहमार्ग पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेत टोळीतील जुबेर उर्फ डबल शेख भिकन( रा. गेदालाल मिल जळगाव,) तन्वीर उर्फ तन्नु रहीम शेख (रा. शिवाजी नगर जळगाव, ) फारूख शाह नुरमोहम्मद फकीर( रा. दुध फेडरेशन, जळगाव) या तीन संशयीत आरोपींताना अटक केली असून,
    त्यांच्या ताब्यातून १७ हजाराची रोख रक्कम हस्तगत केले आहे, लुटमारीच्या घटनेतील उर्वरित पुढील दोन संशशीतांचा शोध सुरू असल्याचे रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी सांगीतले आहे.
हि कामगिरी  पोलीस अधिक्षक  लोहमार्ग औरंगाबाद  गणेश शिंदे,  उपविभागीय पोलीस अधिकारी,  दिपक काजवे लोहमार्ग मनमाड यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अन्वेशन अधिकारी पोलीस सपोनि  रमेश वावरे, पोवा  जयकुमार कोळी पोहवा किरण बोरसे, पोहवा  नितीन पाटील असई  संजय पाटील पीना  राजेश गोराडे, पोना  जितेंद्र चौघरा तसेच रेल्वे सुरक्षा बल पोस्ट अमळनेर येथील निरीक्षक  कुमार श्रीकेश, असई  कुलभूषण सिंह चौहाण, कों नंदू पाटील, काँ सुभाषसिंह, सीआयबी सुरत हेका भूपसिंह मान, हेका  परेश ठाकर यांच्या संयुक्त पणे केलेली आहे.
0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *