नंदुरबारचे विजय चौधरी बनले भाजपाचे स्टार प्रचारक…

Khozmaster
2 Min Read

प्रविण चव्हाण ( जिल्हा प्रतिनिधी )

14 फेब्रुवारी 2023

नंदुरबार -:पुणे जिल्ह्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथील
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने स्टार प्रचाराकांची सूची जाहीर केली असून त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत विजय चौधरी यांचे नाव आल्याने नंदुरबार सारख्या दुर्गम व बहुल आदिवासी भागाच्या कार्यकर्त्याला हा एक मोठा सन्मान या ठिकाणी मानला जात असून खानदेशातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे…
पिंपरी चिंचवड येथे आमदार लक्ष्मण जगताप व कसबा येथे आमदार मुक्ताताई टिळक यांचे दुःखद निधन झाल्याने त्या दोन्ही जागावर पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी कसबा येथे हेमंत नारायण रासने तर पिंपरी चिंचवड येथे अश्विनी लक्ष्मण जगताप हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. यांच्या प्रचाराच्या शुभारंभ झाला असून स्टार प्रचारक म्हणून विजय भाऊ चौधरी यांची नावाची घोषणा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अनुमतीने जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत विजय चौधरी यांचे नाव आल्याने नंदुरबार सारख्या दुर्गम व बहुल आदिवासी भागाच्या कार्यकर्त्याला हा एक मोठा सन्मान या ठिकाणी मानला जात आहे.
विजय चौधरी यांचे दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीत प्राबल्य वाढत असल्याचे यावरून म्हटले जात आहे. त्यांनी राज्यभरात केलेल्या झंजावाती दौऱ्याला देखील या निमित्ताने महत्त्व आले आहे. दरम्यान, दिनांक 14 15 16 फेब्रुवारी हे तीन दिवस सलग विजय चौधरी हे पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पुणे येथे वास्तव्य करणार आहे व ठीक ठिकाणी सभा घेणार आहेत,

अशी माहिती भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे.

0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *