जातपडताळणीच्या त्रृटीची पुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी )

नंदुरबार,दि.18 फेब्रुवारी,2023.

नंदुरबार : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार यांच्याकडे ज्या अर्जदारांनी शैक्षणिक, सेवा, निवडणूककरिता जात पडताळणीचे प्रस्ताव सादर केले आहे. परंतू ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रृटीअभावी समितीकडे प्रलंबित आहेत. अशा प्रलंबित अर्जदारांचे प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविली जात असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य  प्राची वाजे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

ज्या मागासवर्गीय अर्जदारांचे (अनुसूचित जमाती वगळून) प्रस्ताव जात पडताळणीकडे प्रलंबित असेल अशा अर्जदारांनी त्रृटीची पुर्तता करुन आपले प्रस्ताव सोमवार 27 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य  वाजे यांनी केले आहे.

0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *