अॅपे रिक्षा चोरी करणारा आरोपी गजाआड, नंदुरबार शहर पोलिसाची कामगिरी…

Khozmaster
4 Min Read

प्रविण चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी )

 दैनिक.खोज मास्टर.

दि.18 फेब्रुवारी 

अॅपे रिक्षा चोरी करणारा आरोपीस मुद्देमालासह अटक.

नंदुरबार –: नंदुरबार पोलीस स्टेशन हद्दीतील अॅपे रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला नंदुरबार शहर पोलिसांनी कारवाई करून मुद्देमालासह अटक केली आहे.

     याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, अॅपेरिक्षा व आरोपीस 12 तासाचा आत जेरबंद करण्यास नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पथकाला यश. रमेश मगन कुवर,( वय 36, रिक्षा चालक रा. दरीपाडा पोस्ट आमरपाटा, ता. साक्री, जि. धुळे) हे जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे उपचारासाठी आले असता त्यांनी त्यांचे मालकीची 50,000/- रुपये किंमतीची अतुल GEM कंपनीची रिक्षा क्रमांक GJ-19-0293 ही जिल्हा रुग्णालयाचे गेट समोर पार्क करुन ठेवली होती.

सदरची अॅपेरिक्षा ही दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 02: 00 वाजेचे सुमारास जिल्हा रुग्णालयाचे गेट समोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणुन ते दिनांक 17 फेब्रुवारी रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी आले असता त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द नं. 98/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा हा वाहन चोरीशी निगडीत असल्यामुळे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पो. निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेश दिला.

नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या अँपेरीक्षा बाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली. तसेच चोरीस गेलेल्या अॅपेरीक्षाच्या शोधासाठी 02 पथके तयार केली.

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना एक इसम हा चोरीची रिक्षा नंदुरबार शहरा लगत असलेल्या पातोंडा ते होळ रस्त्या लगत फिरत असले बाबत माहीती मिळाल्याने, त्यांनी सदरची माहिती पो. नि. रविंद्र कळमकर यांना सांगीतली. त्याप्रमाणे पो. निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना तात्काळ मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी रवाना करुन सदर इसमाचा शोध घेण्यास सांगीतले. गुन्हे शोध पथकाने पातोंडा ते होळ रस्त्या दरम्यानच्या सापळा रचला असता संशयीत आरोपी हा एका अॅपेरीक्षासह येत असतांना दिसुन आला. पोलीस पथकाने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता परंतु संशयीत आरोपी हा अँपेरीक्षासह पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला.
त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले, त्याचेकडे ताब्यात असलेल्या ॲपे रिक्षा बाबत विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यानंतर त्यास नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आणुन त्याने त्याचे नाव विजय जयंता वळवी, ( 23, रा. खडकी, ता. अक्कलकुआ, जि. नंदुरबार )असे सांगितले.
तसेच त्याचे कडील अॅपेरिक्षा ही त्याने नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालयाचे गेट समोरुन चोरी केल्याची माहिती दिली. त्याचे कडील 50,000/- रुपये किंमतीची अतुल GEM कंपनीची अॅपेरिक्षा क्रमांक GJ-19-0293 ही कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केली.

अशा प्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पथकाला 50,000/- रुपये किंमतीची अतुल GEM कंपनीची रिक्षा (क्रमांक GJ-19-0293) अँपेरीक्षा हस्तगत करण्यात यश प्राप्त झाले आहे.

तसेच आरोपीतास अटक करण्यात आली व त्यास पोलीस कोठडी मिळाली असुन सदर गुन्हयात आणखी आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आरोपी कडुन नंदुरबार जिल्हयातुन चोरी गेलेले इतर वाहने हस्तगत होवु शकतात.

(पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील )

ही कारवाई नंदुरबार पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शना खाली नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, संदिप गोसावी, नरेंद्र पाटील, स्वप्निल पगारे, विजय नागोडे, युवराज राठोड, योगेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.

0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *