मंठा ता १२:- मंठा तालुक्यातील १५ वा वित्त आयोग योजना अंतर्गत पाणी पुरवठा या कामाची गाव व काम निहाय चौकशी व स्थळ पंचनामा करून दोषी विरूध्द कडक कार्यवाही करण्यात यावी गटविकास अधिकारी ना गजानन माळकर यांचे निवेदन.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, २०२० ते २०२३ या कालावधीत १५ वा वित्त आयोग अंतर्गत पाणी पुरवठा चे कामे बहुतांश ग्रा.पं. ला कृती आरखड्या मध्ये समाविष्ट होती परंतू सदरील ग्रा.पं.चे प्रत्यक्ष कामे न करता बनावट मोजमाप पुस्तीका तयार करून तर काही ठिकाणी थातुर माजुर कामे करून लाखो रूपयांची बिले उचलुन लाखो रूपयांचा पहार केलेला आहे.यामध्ये संबंधीत पाणी पुरवठा अभियंता यांचा मोठा हिस्सा पाहण्यात मिळत आहे कारण सदरील अभियंता यांनी चक्क बनावट एम. बी तयार करून शासनाची दिशाभुल तर केलीची गावातील नागरीकांना पाण्या पासुन वंचित ठेवले आहे.१५ वा वित्त आयोगाचे कृती आराखडे पाहता शासनाकडून प्रत्येक कामास प्रत्येक घटकास बजेट दिले आहे त्यानुसार कामे करणे अनिवार्य असतांना देखील पाणी पुरवठा अभियंता यांनी शासनाचे सर्व नियम डावलून कामे केली आहे त्यामध्ये त्यांच्यासह त्या यंत्रणेतीत लोकांची खिशे गरम झाली मात्र नागरीकांना योजना केवळ कागदोपत्री पाहावयास मिळत आहेत.या बाबत प्रत्येक गावातील ज्या त्या वर्षीच्या कृती आरखड्या प्रमाणे पाणी पुरवठा कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी अर्जदारासमक्ष करण्यात यावी व सदरील केलेल्य चौकशी अहवालानुसार दोषी विरूध्द कडक कार्यवाही करण्यात यावी नसता आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. या निवेदनावर गजानन माळकर यांची सही आहे