गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजीत तालुका क्रीडा संकुल कोपरी जिल्हा ठाणे येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय १७ वर्षाखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी च्या मुलीच्या संघाने संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवत पहिल्या फेरीत कोल्हापूर संघाला १ गुणाने हरविले तर उपांत्य फेरीत मुंबई संघाला एकतर्फी २५ गुणांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला व अंतिम फेरीत संपुर्ण सामन्यात वर्चस्व गाजवत नाशिक संघाला १५ गुणांनी हरवीले व सुवर्ण पदकाची ची कमाई केली. विजय संघात अक्षरां अंभुरे, राणी भुजंग, मोनिका पवार, कल्याणी शिंदे, नंदा नागवे, भाग्यश्री गायकवाड, साक्षी शिंदे, दीक्षा शिंदे,आरती डिघे, मुयुरी टकले, वैष्णवी शेवत्रे व पूजा गाडे यांचा समावेश होतो. या संघाला प्रशिक्षक श्री रविंद्र ढगे, श्री गणेश ढगे, संतोष मोरे,अमोल चव्हाण, प्रियंका येळे व जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीचे व्यवस्थापक श्री.प्रमोदजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजय खेळाडूंचे जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना मॕडम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजु सोळुंके साहेब, शिक्षणाधिकारी श्री कैलाश दातखीळ साहेब, उपशिक्षणाधिकारी शाम देशमुख साहेब, प्रशासकीय अधिकारी श्रीमती विनया वडजे मॅडम, प्रशासकीय अधिकारी श्री प्रभाकर शिंदे, लेखाधिकारी साहेब व भाऊसाहेब नेटके यांनी अभिनंदन केले.
Users Today : 22