पालघर प्रतिनिधी – सौरभ काम डी
वारलीपाडा – आपल्या गावागावा मध्ये विविध प्रकारच्या योजना येत असतात आणि त्या योजनेचा आपल्याला कधी कधी लाभ उशिरा मिळतो अश्याच प्रकारे शहापूर तालुक्यातील सर्वात आधी पाणीटंचाई येणाऱ्या कोळीपाडा व वारलीपाडा या अजनुप ग्रामपंचायत मधील दोन पाड्यांसाठी अजनुप ते वारलीपाडा व कोळीपाडा या पाणी योजनेच्या विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ पार पडला.
या तालुक्यातील सर्वात आधी पाणीटंचाई येणाऱ्या कोळीपाडा व वारलीपाडा या गावांची पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत होती. ही बाब नवनिर्वाचित सुशिक्षित सदस्य कु.अजय कथोरे यांनी सरपंच श्री.शांताराम भाऊ भगत व ग्रामसेवक एम.बी.परमार यांच्या लक्षात आणून दिली व कमी खर्चात योग्य नियोजन बद्ध पाणी योजना या गावांसाठी राबवता येईल असा विश्वास निर्माण केला आणि ही बाब लक्षात घेऊन सरपंच व सर्व सदस्यांनी तसेच ग्रामसेवक यांनी त्याला तत्काळ मंजुरी देऊन या कामाचा शुभारंभ केला. अनेक वर्ष पाण्या पासून वंचित असलेल्या कोळीपाडा व वारलीपाडा या गावकऱ्यांनी सदस्य अजय कथोरे तसेच सरपंच शांताराम भगत व सर्व नवीन सदस्यांचे आभार मानले..
Users Today : 27